
अकलूज मध्ये मातंग समाजाचा वधू वर पालक परिचय मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न
मविसे पक्षप्रमुख किरण साठे यांची प्रमुख उपस्थिती
प्रतिनिधी : समस्त मातंग समाजाच्या वतीने माळशिरस तालुक्यातील अकलूज मधील अन्नपूर्णा मंगल कार्यालय येथे मातंग समाज वधू,वर,पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता,कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मातंग समाजाचे नेते व महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे उपस्थित होते,कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली.मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे प्रदेश सचिव अनिल साठे,संपर्क प्रमुख बाळासाहेब कांबळे,युवा सेना जिल्हा संघटक साईराज अडगळे,श्री कमलाकर लांडगे सर, रघुनाथ वाघमारे,सत्यवान कांबळे,नामदेव मिसाळ नागेश तुपसौंदर्य यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सूत्रसंचालन धनाजी साठे,राहुल खंडागळे यांनी केले आणि नाव नोंदणी मल्हारी अष्टुळ,अजय अडगळे सागर नाईक नवरे ईश्वर अ डगळे यांनी केली.

मेळाव्यात एकूण २७० वधू व वरानी नोंदणी केली व स्वतः आणि त्यांच्या पालकांनी कार्यक्रमाला हजेरी लावली.सोलापूर जिल्ह्यातील पहिलाच सर्वात मोठा मेळावा माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे संपन्न झाला.मेळाव्यासाठी आलेल्या सर्व समाजबांधवासाठी आयोजकांकडून उत्तम जेवणाची सोय करण्यात आली होती. मेळाव्याला मुंबई,पुणे,सोलापूर, संभाजीनगर,सातारा,फलटण, सांगली,मोहोळ,इंदापूर,पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाला आलेल्या समाजबांधव व वधू,वर व त्यांच्या पालकांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले.

