जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सन्मानार्थ मविसेचे अर्धनग्न आंदोलन

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सन्मानार्थ मविसेचे अर्धनग्न आंदोलन

गुजरात इन्फोटेक कंपनीचा ठेका रद्द करून,काळ्या यादीमध्ये टाकण्याची मागणी

प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सन्मानार्थ व आपले सरकार सेवा केंद्र (सेतू सुविधा केंद्र ) चा ठेका दिलेल्या गुजरात इन्फोटेक कंपनीचा ठेका रद्द करून काळ्या यादीमध्ये टाकण्याची कारवाई करण्यात यावी.या मागणीसाठी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्या नेतृत्वाखाली अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.यावेळी प्रदेश सचिव अनिल साठे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे,पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख धनाजी साठे,माळशिरस तालुका सरचिटणीस सतीश साठे,माजी सरपंच रामचंद्र साठे,महादेव साठे,शिवाजी शिंदे,प्रतीक खरे,मारुती साठे उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्रचा (सेतू सुविधा केंद्र) संबंधित तहसीलदार यांचे मार्फत अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावा असे दिनांक डिसेंबर २०२४ रोजी एक पत्र पाठविण्यात आले होते त्या पत्रामध्ये उक्त मुद्यानुसार कंपनीने निविदा फॉर्म व करारनामातील अटी,शर्तीनुसार,अहवाल आठ दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे पत्र दिले होते मात्र त्यांनी अहवाल सादर केला नाही तसेच याच माहितीसाठी दिनांक मार्च २०२५ रोजी दुसरे पत्र पाठविण्यात आले आहे,त्या पत्राला केराची टोपली दाखवण्याचे काम कंपनीने केले आहे.त्यामुळे सदर कंपनीचा ठेका रद्द करण्याचा व काळ्या यादीमध्ये टाकण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. सदर कंपनीवर कारवाई करण्याचे आश्वासन प्रभारी जिल्हाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांनी पक्षप्रमुख किरण साठे यांना दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom