डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहासाठी खाजगी जमीन विकत घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहासाठी खाजगी जमीन विकत घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

किरण साठेंचा पाठपुरावा अखेर यशस्वी

प्रतिनिधी : माळशिरस : अकलूजमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेले सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मुलांचे शासकीय वस्तीगृह हे १९८४ सालापासून कार्यरत आहे,आणि ते भाड्याच्या इमारतीमध्ये कार्यरत असून त्या इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या सुविधा मिळत नाहीत आणि शासनाचे कोट्यवधी रुपये भाड्याच्या रुपात त्या इमारत मालकांना जात आहेत म्हणून त्याची नव्याने निर्मिती करण्यासाठी खाजगी जमीन विकत घेवून वस्तीगृहाचे बांधकाम करण्यात यावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस आणि बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांनी मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा केला आहे,त्या पाठपुराव्याला यश आल्याचे पाहायला मिळत आहे.

२४ जानेवारी रोजी पुणे येथील महाराष्ट्र राज्याचे समाजकल्याण आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे यांची भेट घेवून वस्तीगृहाच्या निर्मिती साठी खाजगी जागा विकत घेण्याचा निर्णय तात्काळ न झाल्यास २६ जानेवारी रोजी तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता.त्यानंतर लगेच सोलापूर जिल्हा सहायक आयुक्त कैलास आडे यांनी २५ जानेवारी रोजी अकलूज येथील वस्तीगृहाला भेट दिली आणि त्याच दिवशी जिल्हा माहिती अधिकारी यांना पत्रव्यवहार करून अनुसूचित जाती,जमाती,व इतर मागास प्रवर्गाकरिता शासकीय वस्तीगृह ही योजना १९८४ पासून सुरू करण्यात आली.यामध्ये विद्यार्थ्यांच्या,निवासाची,भोजनाची व इतर आवश्यक सोयी सुविधांची व्यवस्था करण्यात येते.त्यासाठी अकलूज नगरपरिषदेच्या हद्दीत २ एकर जमीन खरेदी करण्यासाठी जिल्ह्यातील स्थानीक वृत्तपत्रांमध्ये खाजगी जमीन खरेदी बाबत विनामूल्य जाहिरात प्रसिद्धीस देण्यात यावी.असे कळविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ८००० ते १०००० चौ.फूट पक्की बांधकाम असलेली इमारत भाड्याने घ्यावयाची असल्याने त्याचीही जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहासाठी किरण साठे यांनी केलेला पाठपुरावा यशस्वी झाला आहे.त्यामुळे किरण साठेंचे संपूर्ण अनुसूचित जाती जमाती आणि इतर प्रवर्गातील समाजतून कौतुक केले जात आहे.

अकलूजमधील सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाचे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहाच्या निर्मितीसाठी २०२१ पासून केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे,त्यासाठी मंत्रालय,समाजकल्याण आयुक्त,शिक्षण विभागाचे सह आयुक्त,पुणे विभागाचे उपायुक्त,सहायक आयुक्त सोलापूर यांची वारंवार भेट घेवून पाठपुरावा केला असल्यानेच हा विषय मार्गी लागला आहे,आता या वस्तीगृहासाठी जमीन कोण विकत देण्यासाठी तयार होतंय हे पाहणे आपली जबाबदारी आहे,त्यामुळे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने काढलेल्या जाहिरातच्या माध्यमातून खाजगी जमीन विकत देण्यासाठी जमीन धारकांनी प्रतिसाद दिला तरच हा संपूर्ण विषय मार्गी लागेल

किरण साठे-सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर जिल्हा,संस्थापक अध्यक्ष बहुजन ब्रिगेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom