पावसाळा सुरू होण्यापूर्वी अकलूज शहरातील सर्व मोठे नाले व ओढे स्वच्छ करा – महेश शिंदे

पावसाळा सुरू होण्यापूर्वी अकलूज शहरातील सर्व मोठे नाले व ओढे स्वच्छ करा – महेश शिंदे

मैत्री प्रतिष्ठान ने अकलूज नगर परिषद कडे केली मागणी.

प्रतिनिधी : अकलूज : अकलूज शहरातील मोठे नाले व ओढे स्वच्छ करा.जुन महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडयात पासाळयाला सुरुवात होत असुन, अकलूज शहरातील प्रत्येक प्रभागातील तुंबलेले लहान मोठे, नाले, ओढे घाणीने भरलेले असुन यामुळे पावसाचे पाणी नाला, गटार,ओढ्या मध्ये थांबुन सर्व सामान्य नागरीकांचया घरात शिरते यावर अंमलबजावणी करण्यासाठी आपण येत्या एक दोन आठवडयात शहरातील सर्वच प्रभागातील लहान मोठे नाले, गटार,ओढे साफ सफाई करुन स्वच्छ करुन व पडझड झालेले नाले तात्काळ दुरुस्त करुन घ्यावेत, व नागरीकांची पावसाळ्यात गैरसोय होणार नाही व याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही याची खबरदारी म्हणून आपण जबाबदारी घेऊन सर्वच नाले, ओढे साफ सफाई करुन दुरुस्त करुन घ्यावे.
तसेच गेल्या अनेक वर्षेपासून प्रलंबित असलेला गिरजणी चौक ते गांधी चौक गांधी चौक ते विकास नगर तसेच अनेक ठिकाणी नाल्याची ओढ्याचे सर्व घाण पाणी पावसाळयात स्थानिक नागरिकांच्या घरात शिरते व याला महापुराचे रुप प्राप्त होते. तरी आपण या नाल्याची ओढ्याची तात्काळ स्वच्छता करावी व स्थानिक नागरीकांच्या या जिवघेण्या त्रासातुन मुक्तता करावे असे निवेदन मैत्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीने अकलूज नगर परिषदेला देण्यात आले.व यावर लवकरात लवकर कामाची पाहणी करून काम चालू करू असे अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी आश्वासन दिले आहे. यावेळी मैत्री प्रतिष्ठान चे अध्यक्ष महेश शिंदे, कार्यकारणी सदस्य शंकर मस्के, अक्षय गायकवाड व इतर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom