MSRDC कार्यालय पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे १जानेवारी रोजी ठिय्या आंदोलन

पंढरपूर(वाखारी)ते म्हसवड या रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

अकलूज—प्रतिनिधी–पंढरपूर(वाखरी)ते म्हसवड या राष्ट्रीय महामार्गच्या रस्त्याच्या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी पुणे येथील रस्ते विकास महामंडळ कार्यालयाचे अधिक्षक अभियंता श्री ए.पी.नागरगोजे यांना भेटून निवेदन देऊन केली आहे.

पंढरपूर(वाखरी)ते म्हसवड या राष्ट्रीय महामार्गाचे काम करण्याचा ठेका हा पुणे येथील रोडवेज सोल्यूशन प्रा लिमिटेड कंपनीला मिळाला आहे,त्या महामार्गाच्या कामामध्ये बेकायदेशीर रित्या उपसा केलेली व निकृष्ठ दर्जाची मातीमिश्रित वाळू वापरून हे काम केले असल्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी आपल्या निवेदनामध्ये नमुद केले आहे, फेब्रुवारी २०१९ ते २०डिसेंबर२०१९ अखेर केलेल्या कामामध्ये अनियमितता व निकृष्ठ मटेरिअल वापरून काम केल्याची तक्रार अधीक्षक अभियंता रस्ते विकास महामंडळ पुणे यांच्याकडे केली आहे,आणि या कामाची चौकशी करून संबंधित अधिकारी व या कामाचा ठेका मिळालेल्या रोडवेज सोल्यूशन प्रा लिमिटेड पुणे कंपनीवर चौकशी दरम्यान दोषी आढळल्यास येत्या ३१ डिसेंबर रोजी पर्यंत कारवाई न केल्यास १जानेवारी २०२० रोजी पुणे येथील अधीक्षक अभियंता श्री ए.पी.नागरगोजे यांच्या कार्यालयासमोर तीव्र ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनामध्ये नमूद केले आहे.

चौकट
पंढरपूर ते वाखरी या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची चौकशी करून संबंधित कामामध्ये अनियमितता व निकृष्ठ मटेरिअल वापरल्याचे आढळल्यास संबंधित अधिकारी व ठेकेदार असलेल्या रोडवेज सोल्यूशन प्रा लिमिटेड कंपनी पुणे यांच्यावरती कारवाई करणार.

ए. पी. नागरगोजे
अधीक्षक अभियंता
रस्ये विकास महामंडळ पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom