अकलूज येथील डाॅ.गांधी यांचे अभिजीत हॉस्पिटल मधील डॉक्टर यांचे मनमानी कारभाराबाबत दलित  उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग यांना निवेदन

अकलूज येथील डाॅ.गांधी यांचे अभिजीत हॉस्पिटल मधील डॉक्टर यांचे मनमानी कारभाराबाबत दलित उपविभागीय अधिकारी ( प्रांत साहेब ) माळशिरस विभाग यांना निवेदन

प्रतिनिधी—आज२४ तास –अकलूज

१. सदर हॉस्पिटलमध्ये रूग्णांना अवश्यक असणाऱ्या सोई सुविधा उपलब्ध नाहीत.
२. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही.
३. रूग्णालयात दाखल करून घेते वेळी १० ते १५ हजार रुपये डिपॉझिट घेतले शिवाय दाखल करून घेतले जात नाही.
४. अ‍ॅडमिट करून घेतले नंतर लगेचच ५ ते १० हजार रुपयेची बाहेरून औषधे आणनेकरिता सांगितले जाते.
५.सदरची औषधे पेशेंट जवळ न ठेवता कुठे ठेवली जातात हे पेशेंटला किंवा पेशेंटचे नातेवाईकांना माहिती नसते.
६. सदर औषधा मधील किती औषधांचा वापर केला याची माहिती पेशेंटचे नातेवाईक यांना नसते.
७. पेशंट रेग्युलर रूममध्ये असले तरी एकच नातेवाईक यांना थांबवले जाते.
८. सकाळी ८.०० वाजताचे आगोदर नातेवाईक यांना गेटच्या आत प्रवेश दिला जात नाही.
९. डॉक्टरांच्या कडून पेशेंटला आरेरावीची भाषा दम तसेच शिवीगाळी केली जाते.
१०. वयस्कर पेशेंट महिला पेशेंट असले तरीही आरेतुरेची भाषा वापरली जाते.
११. २ ते ३ दिवस झाले की काही तरी कारण सांगून ऑपरेशन करावे लागेल असे सांगून अजून पैशाची मागणी केली जाते पैसे भरले शिवाय पुढील उपचार केले जात नाहीत.
१२. पेशंट आजारी असल्याने पेशेंटची चिडचिड होते आशा वेळी डॉक्टर कडून पेशेंटला आधाराची गरज असते परंतु हेच डॉक्टर पेशेंटला दमदाटी करून इतर भिती घालून टॉर्चर करतात.
१२. सदर हॉस्पिटल हे कोणत्या ही निगराणीखाली नाही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले नाहीत त्यामुळे सदर हॉस्पिटलमध्ये डाॅक्टरांचाच मनमानी कारभार चालत आहे.
१३. पेशेंटला टाॅयलेटला जायचे असेल तरी सोडले जात नाही त्यामुळे पेशेंटला टॉयलेट्सचे प्रॉब्लेम झाले आहेत.
१४. डाॅक्टरांनी सांगितलेले ऑपरेशन न करता नेहले असता पेशेंट ठणठणीत बरा झालेले आहेत.
तरी वरील प्रमाणे सर्व सामान्य रुग्णांच्या जिवीताशी खेळणाऱ्या डाॅक्टरांवर योग्य ती कारवाई करून सदर हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्यात यावा या बाबत *दलित महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा मा. नगमाताई शिवपालक (चौधरी)* यांच्या वतीने मा उपविभागीय अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले सदर बाबत येत्या आठ दिवसात योग्य ती कारवाई करणेत यावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मा.सतिश महापुरे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मा. छगननाना गायकवाड मा.संतोष खंडागळे सामाजिक कार्यकर्ते तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom