मातंग समाज्यावरील अन्याय सहन करुन घेतला जानार नाही– भारतीय दलित महासंघ

मातंग समाज्यावरील अन्याय सहन करुन घेतला जानार नाही भारतीय दलित महासंघ

प्रतिनिधी—आज २४ तास —माळशिरस–सोलापूर शहरातील मातंग समाजातील अल्पवयीन मुलीवरील सामुहिक बलात्कार प्रकरणी अद्यापही सर्व आरोपींना अटक केली नसून उर्वरित सर्व आरोपींना अटक करून सदरचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे आणि दोषी आरोपींना फाशीची शिक्षा करावी.. यासाठी भारतीय दलित महासंघाचे वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
यावेळी प्रांत अकलुज यांचे मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तशा आशयाचे लेखी निवेदन सादर करण्यात आले. यावेळी, अत्त्याचार पीडित मुलीस अथवा पिडीत कुटुंबातील व्यक्तीला शासकीय सेवेत नोकरीस घेण्यात यावे, महिला भगीनींवर वरील वाढते अन्याय अत्याचार टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने बार्टी , समाज कल्याण विभागा मार्फत प्रत्येक तालुक्यात कायदेशीर सल्ला केंद्र उभारून त्यात महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करावीत व तसेच पिढीत कुटुंबाला पोलिस संरक्षण देउन ताक्ताळ 15 लाख आर्थीक मदत देण्यात यावी. आदी मागण्यांचे निवेदन भारतीय दलित महासंघाचे अध्यक्ष संजीव खिलारे यांचताब्यात मार्गदर्शनाखाली व प.म.अध्यक्ष अध्यक्ष दादासाहेब लोखंडे यांच्या नेत्रुत्वाखाली देण्यात आले या वेळी प्रदेश उपाध्यक्ष उमाजीआण्णा मिसाळ , प.म.दादासाहेब लोखंडे , माळशिरस तालुका अध्यक्ष आकाशभैय्या लोखंडे , सो.जि.उपाध्यक्ष युवराज लोखंडे , माळशिरस ता.उपाध्यक्ष मुबारक सय्यद , मा.से.भा.संस्था सो.जि.अध्यक्ष महेंद्र साठे , पत्रकार सचिन पवार , सामाजीक कार्यकत्या रेशमाताई साठे , अरुण भोसले , सतिश शिंदे , धिरज जावळे , पत्रकार सचिन रणदिवे आदि उपस्थितो होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom