
बहुजन ब्रिगेडची अकलूज येथे २३ फेब्रुवारी रोजी महत्वाची बैठक
प्रतिनिधी—अकलूज—बहुजन ब्रिगेड संघटनेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून संघटनेचे अध्यक्ष किरण साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत अकलूज येथे महत्वाची बैठक आयोजित केली असल्याचे बहुजन ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष धनाजी पाटील यांनी सांगितले.
भिमा-कोरेगाव दंगलीच्या पार्श्वभूमीवर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांनी बहुजन समाजामध्ये एकोपा रहावा महाराष्ट्र राज्यामध्ये बहुजन समाज एकसंघ नांदला पाहिजे, या भूमिकेला अनुसरून संघटनेची स्थापना केली होती, त्याचप्रमाणे संघटनेची वाटचाल चालू असून या संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न शासन दरबारी मांडण्याचे काम संघटनेचे पदाधिकारी करीत असतात.येत्या १ मार्च ला बहुजन ब्रिगेड संघटनेचा वर्धापनदिन असल्याने व संघटनेच्या कामाचा आढावा घेण्याच्या दृष्टीने तसेच वर्धापनदिना निमित्त वेगवेळे कार्यक्रम आयोजित करण्याच्या हेतूने संघटनेचे अध्यक्ष किरण साठे यांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकारी यांची बैठक अकलूज येथे दिनांक २३ फेब्रुवारी रोजी आयोजित केली असल्याची माहिती बहुजन ब्रिगेडचे माळशिरस तालुका अध्यक्ष धनाजी पाटील यांनी दिली असून सर्व पदाधिकारी यांनी बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.