सिव्हिल सर्जन यांच्याकडून डॉ. स्वाती बोधले यांची मंगळवेढा येथे तडकाफडकी उचलबांगडी

करकंब ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या अरेरावीविरोधात महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या आंदोलनाला मोठे यश;

करकंब:
ग्रामीण रुग्णालय, करकंब (ता. पंढरपूर) येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती एकनाथ बोधले यांच्याकडून रुग्णांना मिळणारी हीन वागणूक, अरेरावी आणि उपचारास नकार देण्याच्या गंभीर प्रकरणाची प्रशासनाने अखेर अधिकृत दखल घेतली आहे. या अन्यायकारक कारभाराविरोधात आणि डॉ. स्वाती बोधले यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या तीव्र आंदोलनाला मोठे यश आले असून प्रशासनाने थेट कारवाईचे आदेश जारी केले आहेत.महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या महिला तालुकाध्यक्ष लक्ष्मी ताई धोत्रे आणि स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाला आधीच निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला होता. त्यानुसार, दिलेल्या मुदतीत कोणतीही कारवाई न झाल्याने १६ ऑक्टोबर २०२६ रोजी करकंब ग्रामीण रुग्णालयासमोर ‘तीव्र बेमुदत बोंबाबोंब आंदोलन’ करण्यात आले. हे आंदोलन महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे, पंढरपूर तालुका अध्यक्ष किरण घाडगे आणि महिला तालुका अध्यक्ष लक्ष्मी धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. आंदोलनादरम्यान स्वतः पक्षप्रमुख किरण साठे यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी करकंब येथील असंख्य महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनानंतर सोलापूरच्या जिल्हा शल्यचिकित्सक (सिव्हिल सर्जन) डॉ. वर्षा गायकवाड-डोईफोडे यांनी स्वतः घटनास्थळी येऊन चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते.


दिलेल्या आश्वासनानुसार, १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सिव्हिल सर्जन डॉ. वर्षा गायकवाड-डोईफोडे यांनी करकंब ग्रामीण रुग्णालयात प्रत्यक्ष येऊन चौकशी केली. यावेळी परिसरातील असंख्य महिला व पुरुषांनी उपस्थित राहून संबंधित वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती बोधले यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध आणि रुग्णांच्या हेळसांडीबाबत आपल्या प्रत्यक्ष तक्रारी नोंदविल्या.
ग्रामस्थांचा तीव्र संताप, तक्रारींमधील गांभीर्य आणि आंदोलनाची दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने (जा.क्र.जिशचि/कार्यालय/आस्था/तक्रार/११५३०-३३/२०२६) अधिकृत आदेश जारी केला आहे. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती एकनाथ बोधले यांची सेवा तात्पुरत्या स्वरूपात ग्रामीण रुग्णालय, मंगळवेढा (जि. सोलापूर) येथे पुढील आदेशापर्यंत वर्ग (प्रतिनियुक्ती) करण्यात आली आहे.या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले असून, डॉ. बोधले यांना करकंब रुग्णालयातून तात्काळ कार्यमुक्त करून मंगळवेढा येथे हजर करून घेण्याबाबत वैद्यकीय अधीक्षकांना सूचित केले आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी चौकशी समिती गठीत करण्यात आली असून आठ दिवसांत चौकशी अहवाल प्राप्त करून पुढील प्रशासकीय कारवाई वरिष्ठ कार्यालय (उपसंचालक, आरोग्य सेवा पुणे मंडळ) यांच्याकडे प्रस्तावित केली जाणार आहे. महाराष्ट्र विकास सेना पक्षाने सामान्यांच्या हक्कासाठी आणि अन्यायाविरुद्ध पुकारलेल्या या लढ्याला अखेर मोठे यश आले असून, प्रशासनाच्या या धडक कारवाईचे परिसरातून जोरदार स्वागत होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom