कर्जत येथील ‘सेंद डोंगर प्रकल्पा’विरोधात महाराष्ट्र विकास सेना आक्रमक; वृक्षतोड न थांबवल्यास मंत्रालयात घुसण्याचा किरण साठे यांचा आक्रमक इशारा

कर्जत:
कर्जत पूर्व भागातील सह्याद्रीच्या अति-संवेदनशील पर्वतरांगांमध्ये ३००० MW क्षमतेचा ‘सेंद डोंगर हायड्रो पॉवर प्रकल्प’ उभारला जात आहे. यासाठी तब्बल २३३ हेक्टर वनजमिनीवरील ३२,४५० समृद्ध वृक्षांची कत्तल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निसर्गघातकी आणि विनाशकारी प्रकल्पाला तात्काळ स्थगिती देऊन तो कायमचा रद्द करावा, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र विकास सेना’ पक्षाचे प्रमुख किरण साठे यांनी थेट मंत्रालयात धडक दिली आहे. पक्षाच्या वतीने मा. मुख्यमंत्री, मा. वन व पर्यावरण मंत्री आणि अप्पर मुख्य प्रधान सचिव (वने) यांना अधिकृत निवेदने देऊन या प्रकल्पावर तात्काळ कायदेशीर रोक लावण्याची मागणी करण्यात आली.

या प्रकल्पामुळे होणाऱ्या पर्यावरणीय दुष्परिणामांवर बोट ठेवताना निवेदनात म्हटले आहे की, एवढ्या मोठ्या प्रमाणावर घनदाट झाडे तोडल्यामुळे मुंबई-पुणे परिसरातील मान्सूनच्या चक्रावर विपरीत परिणाम होईल. हरित पट्टा नष्ट झाल्यामुळे हवेतील कार्बनचे प्रमाण वाढून शुद्ध हवा विषारी होईल, तसेच भूजल पातळी घटून तीव्र दुष्काळ, ढगफुटी आणि माळीणसारख्या भीषण दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याचा धोका निर्माण झाला आहे. कॉर्पोरेट लॉबीच्या फायद्यासाठी चाललेल्या या प्रकल्पामुळे स्थानिक आदिवासी, ठाकूर जमात आणि शेतकरी देशोधडीला लागून भूमीहीन होणार आहेत, असा आरोपही किरण साठे यांनी केला आहे.

प्रशासनाने तात्काळ ही वृक्षतोड न थांबवल्यास तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा पक्षाने दिला आहे. पोलिसांनी बळाचा वापर करून जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यास स्थानिक जनतेसह जंगलात व रस्त्यावर उतरू, तसेच थेट मंत्रालयात घुसून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू, असा आक्रमक इशारा ‘महाराष्ट्र विकास सेना’ पक्षाने दिला आहे. या पत्राच्या प्रति विभागीय आयुक्त (कोकण विभाग), जिल्हाधिकारी (रायगड) आणि वनपरिक्षेत्र अधिकारी (कर्जत) यांनाही योग्य कार्यवाहीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom