पुणे पदवीधर-शिक्षक निवडणूक:२०२६

पक्षप्रमुख किरण साठे जो आदेश देतील, त्याच उमेदवाराचे काम करणार! जिल्हाध्यक्ष समीर मुजावर आणि महिला जिल्हाध्यक्ष काजलताई कांबळे यांचे प्रतिपादन

कोल्हापूर (प्रतिनिधी):पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची राजकीय रणधुमाळी शिगेला पोहोचली असून, सर्वच प्रमुख राजकीय आघाड्यांनी आपली ताकद पणाला लावली आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी (MVA) या दोन्ही प्रमुख आघाड्यांच्या उमेदवारांमध्ये थेट सामना रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर, कोल्हापूर जिल्ह्यातून एक मोठी राजकीय घोषणा समोर आली आहे. महाराष्ट्र विकास सेना पार्टीचे पक्षप्रमुख श्री. किरण साठे जो आदेश देतील, त्याच उमेदवाराला पक्षाचा अधिकृत पाठिंबा दिला जाईल,अशी घोषणा महाराष्ट्र विकास सेनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री. समीर मुजावर आणि महिला आघाडी जिल्हाध्यक्ष काजलताई कांबळे यांनी संयुक्तरित्या केली आहे.पुणे विभाग निवडणुकीत उमेदवारांची चित्रे स्पष्ट झाली असून, महाविकास आघाडीतर्फे पदवीधर मतदारसंघात सौ. हर्षदा देशमुख-जाधव आणि शिक्षक मतदारसंघातून श्री. जयंत आसगावकर रिंगणात आहेत. तर दुसरीकडे, भाजपा-महायुतीतर्फे पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. स्मिताताई योगेश जाधव आणि शिक्षक मतदारसंघासाठी श्री. कौस्तुभ गावडे निवडणुकीच्या मैदानात नशीब आजमावत आहेत. या दोन्ही प्रमुख आघाड्यांचे उमेदवार समोरासमोर आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्र विकास सेनेचे मोठे संघटन असून, हजारो पदवीधर व शिक्षक मतदार त्यांच्या थेट संपर्कात असल्यामुळे समीर मुजावर व काजलताई कांबळे यांच्या या भूमिकेला राजकीय वर्तुळात मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.या संदर्भात अधिकृत भूमिका मांडताना जिल्हाध्यक्ष समीर मुजावर व महिला जिल्हाध्यक्ष काजलताई कांबळे म्हणाले की, “पुणे विभाग निवडणुकीच्या रिंगणात महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पार्टीचे प्रमुख उमेदवार आमनेसामने उभे आहेत. मात्र, आमची निष्ठा ही केवळ आमचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्याशी आहे. ते ज्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचा नावाची घोषणा करतील किंवा ज्याला पाठिंबा देण्याचा पक्षादेश देतील, त्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी आम्ही कोल्हापूर जिल्ह्यात अहोरात्र कष्ट करू. पक्षप्रमुख किरण साठे साहेबांचा आदेश हाच आमच्यासाठी अंतिम शब्द असेल.”पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की,आमच्या संपर्कात असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो पदवीधर आणि शिक्षक मतदारांना मतदानासाठी प्रेरित करून, त्यांनी आदेश दिलेल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी अत्यंत प्रामाणिकपणे काम करतील. महाराष्ट्र विकास सेनेच्या या स्पष्ट भूमिकेमुळे आता पक्षप्रमुख किरण साठे नेमका कोणाला पाठिंबा जाहीर करतात आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो मतदारांचे पारडे कोणाच्या बाजूने झुकते, याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom