
महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या उपोषणाला मिळाले मोठे यश;
माळशिरस : ग्रामपंचायत माळखांबी येथील बंद असलेला RO प्लांट त्वरित सुरू करावा, नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा आणि मंजूर घरकूल धारकांना विना अडचण लाभ मिळवून द्यावा,या प्रमुख मागण्यांसाठी आज माळखांबी ग्रामपंचायत कार्यालयासमोर करण्यात आलेल्या तीव्र उपोषणाला अखेर यश आले आहे. या आंदोलनामध्ये महाराष्ट्र विकास सेना पार्टीचे माढा विधानसभा अध्यक्ष श्री. बिभीषण सुरेश साठे आणि माळशिरस तालुका सरचिटणीस सतीश साठे हे उपोषणाला बसले होते.या उपोषणाची प्रशासनाने अत्यंत गांभीर्याने दखल घेतली. माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (वर्ग-१) श्री.रघुनाथ पांढरे यांनी याच उपोषणाला अनुसरून तात्काळ अधिकृत लेखी पत्र आणि आदेश जारी केले. या पत्रामध्ये त्यांनी ‘RO प्लांट तात्काळ चालू करावा’, ‘परिसरातील CCTV कॅमेरे सुरू करावेत’ आणि इतर दोन मागण्या संदर्भात ‘नियमानुसार तात्काळ योग्य ती कायदेशीर कारवाई करून अर्जदारांना आंदोलनापासून परावृत्त करावे’, असे स्पष्ट निर्देश दिले होते.गटविकास अधिकाऱ्यांचे हे अधिकृत लेखी पत्र घेऊन विस्तार अधिकारी रवि पवार, सुनील शिंदे आणि ग्रामसेवक श्री. सावंत यांनी उपोषण स्थळी प्रत्यक्ष भेट दिली. अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांचे ते लेखी पत्र उपोषणकर्त्यांना सुपूर्द केले आणि मागण्यांवर तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले. प्रशासनाच्या या ठोस आणि सकारात्मक लेखी पत्रानंतर आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त करत अखेर आपले उपोषण मागे घेतले. यावेळी महाराष्ट्र विकास सेना पार्टी चे प्रदेश सचिव अनिल साठे, युवा सेना जिल्हा संघटक साईराज अडगळे, संजय निंबाळकर.अकलूज शहर कार्याध्यक्ष किरण खंडागळे,
जगन्नाथ कस्तुरे.भागवत सरतापे. श्रीमंत भगत. सागर बाबर.अतिश साठे. विशाल साठे.महेश साठे. सुनील साठे.मारुती साठे. सतीश साठे. अमोल जाधव गोपीनाथ साठे अशोक पुजारी उपस्थित होते.