
अकलूज : महाराष्ट्र विकास सेना पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा पक्षप्रमुख किरण साठे,तसेच त्यांचे ज्येष्ठ बंधू सुनील साठे व अनिल साठे यांच्या मातोश्री कै. चांगुणा तानाजी साठे यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यासाठी त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार,दिनांक २० सप्टेंबर २०२६ रोजी त्यांच्या अकलूज येथील निवासस्थानी संपन्न होणार आहे. या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये सकाळी १०:०० ते १२:०० या वेळेत ह.भ.प. दत्तात्रय घाडगे महाराज यांचे सुश्राव्य प्रवचन व कीर्तन होईल. कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर उपस्थित सर्व भाविक,स्नेही आणि पाहुण्यांसाठी भोजन व महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. हा सोहळा महर्षी कॉलनी,अकलूज,ता.माळशिरस, जि.सोलापूर येथील साठे परिवाराच्या निवासस्थानी पार पडणार असून,या भक्तीमय कार्यक्रमास व भोजनास सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे नम्र आवाहन समस्त साठे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.