
राज्यात चांगला पाऊस पडू दे आणि मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची सद्बुद्धी दे:
पंढरपूर:राज्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा पक्षप्रमुख किरण साठे यांनी आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. राज्यातील दुष्काळी भागाचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर त्यांनी पांडुरंगाच्या चरणी जनतेसाठी आणि बळीराजासाठी विशेष साकडे घातले.”राज्यात लवकरात लवकर समाधानकारक पाऊस पडू दे आणि राज्यातील दुष्काळी भागातील जनता व शेतकऱ्यांना आर्थिक स्वरूपात तात्काळ मदत देण्याची सद्बुद्धी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लाभू दे,” अशी प्रार्थना किरण साठे यांनी विठ्ठलाच्या चरणी केली.दुष्काळी परिस्थितीचा घेतला आढावादर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना पक्षप्रमुख किरण साठे म्हणाले की, सध्या राज्यातील अनेक भागांत दुष्काळाचे सावट असून शेतकरी आणि सर्वसामान्य जनता अत्यंत अडचणीत आहे. पिके करपून गेली असून पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. या कठीण काळात सरकारने केवळ घोषणाबाजी न करता प्रत्यक्ष मदत करणे गरजेचे आहे.सरकारकडे आर्थिक मदतीची मागणीकिरण साठे यांनी पुढे बोलताना राज्य सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, “शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे, पण आज तोच हवालदिल झाला आहे. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दुष्काळी भागातील जनतेचा आणि शेतकऱ्यांचा अंत न पाहता, त्यांना तात्काळ थेट बँक खात्यात आर्थिक स्वरूपात मदत जाहीर करावी. सरकारने या संवेदनशील विषयावर तात्काळ निर्णय घ्यावा, यासाठीच आम्ही आज विठ्ठलाच्या चरणी साकडे घातले