अकलुज उपजिल्हा रुग्णालयाला डॉ.अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्या,*अन्यथा मंत्रालयासमोर बेमुदत आमरण उपोषण; महाराष्ट्र विकास सेनेचा मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांना थेट इशारा

प्रतिनिधी: अकलुज : येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयाला (SDH) “राष्ट्रपुरुष साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे उपजिल्हा रुग्णालय” असे नाव देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र विकास सेनेने थेट मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांच्या दालनात आक्रमक धडक दिली आहे. महाराष्ट्र विकास सेना पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा पक्षप्रमुख किरण साठे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे प्रदेश सचिव अनिल साठे यांनी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी या संदर्भातील मागणीचे पत्र थेट राज्याचे मुख्यमंत्री आणि सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांना सादर केले असून, शासनाने लवकरात लवकर यावर सकारात्मक निर्णय घेऊन शासकीय आदेश निर्गमित न केल्यास थेट मुंबईत मंत्रालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला बसण्याचा आक्रमक इशारा दिला आहे.पक्षप्रमुख किरण साठे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेल्या या निवेदनात पक्षाचे प्रदेश सचिव अनिल साठे यांनी म्हटले आहे की,माळशिरस तालुक्यातील अकलुज हे प्रमुख केंद्र असून येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय हे हजारो गरीब, वंचित आणि गरजू रुग्णांसाठी हक्काचे आरोग्य केंद्र आहे. या लोकोपयोगी रुग्णालयाला उपेक्षित,कष्टकरी आणि शोषित समाजाच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या डॉ. अण्णाभाऊ साठे यांचे नाव देणे अत्यंत न्याय्य आणि गौरवस्पद ठरेल.भारत सरकारच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान’ने देखील आपल्या अधिकृत यादीत डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचा समावेश करून त्यांचा राष्ट्रीय पातळीवर गौरव केला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनानेही स्थानिक बहुजन,श्रमिक आणि नागरिकांच्या तीव्र भावनांचा आदर करणे गरजेचे आहे.या पत्राची मुख्यमंत्री सचिवालय आणि आरोग्य मंत्रालयाकडून अधिकृत दखल घेण्यात आली असून, प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र,केवळ कागदी घोडे न नाचवता शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा,अशी पक्षाची आग्रही भूमिका आहे.लवकरात लवकर रुग्णालयाच्या नामांतराचा अधिकृत शासकीय आदेश न निघाल्यास,लोकभावनेचा अनादर करणाऱ्या प्रशासनाविरुद्ध मंत्रालयासमोर तीव्र स्वरूपाचे बेमुदत आमरण उपोषण छेडले जाईल,असा स्पष्ट आणि आक्रमक इशारा महाराष्ट्र विकास सेनेने दिला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom