
प्रतिनिधी: कोल्हापूर: शहरातील सदर बाजार परिसरामध्ये ‘महाराष्ट्र विकास सेना’ पक्षाच्या नवीन शाखेचे अत्यंत दिमाखदार सोहळ्यात आणि उत्साही वातावरणात उद्घाटन करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष राजेश खरे यांच्या शुभहस्ते व महिला सेना जिल्हाध्यक्ष काजल कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत फित कापून या शाखेचा दणक्यात शुभारंभ झाला.सदर बाजार परिसरातील या नवीन शाखेमुळे पक्षाच्या स्थानिक बळकटीकरणाला मोठी गती मिळणार आहे.या उद्घाटन प्रसंगी पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष काजल कांबळे, नवनियुक्त शाखाध्यक्ष बबलू कांबळे,शाखा उपाध्यक्ष निखिल हत्तेकर, सरचिटणीस तुषार कांडगावकर आणि शाखा सचिव श्रीकांत शिंदे यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सध्या कोल्हापूर जिल्ह्यात वेगाने सुरू आहे.पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे, जिल्हाध्यक्ष समीर मुजावर आणि महिला जिल्हाध्यक्ष काजल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात पक्षाची घोडदौड सुरू असून, पक्ष पूर्णपणे पुरोगामी विचारांचा वारसा घेऊन पुढे चालला असल्याचे या प्रसंगी सांगण्यात आले.नवीन शाखेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध राहू, असा विश्वास स्थानिक नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमामुळे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात महाराष्ट्र विकास सेनेने आपली जोरदार उपस्थिती दर्शवली आहे.