माळशिरस तालुक्यातील विविध शाखांना भेटी; स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्री, खासदार व आमदारांशी थेट संपर्क!

महाराष्ट्र विकास सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष किरण साठे यांचा पाणीव,तरंगफळ,गारवड,चांदापुरी,गोरडवाडी दौरा!

माळशिरस : महाराष्ट्र विकास सेना पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष किरणसाहेब साठे यांनी माळशिरस तालुक्यातील पाणीव, तरंगफळ,चांदापुरी,गारवड आणि गोरडवाडी येथील पक्ष शाखांना अधिकृत भेटी दिल्या.या दौऱ्यादरम्यान त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शाखांमधील कार्यकर्त्यांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांची गंभीर दखल घेत किरणसाहेब साठे यांनी थेट जिल्ह्याचे पालकमंत्री,खासदार आणि आमदार यांच्याशी संपर्क साधला. लोकप्रतिनिधींशी थेट चर्चा करून त्यांनी कार्यकर्त्यांच्या मागण्या आणि स्थानिक प्रश्न तातडीने मांडले व ते सोडवण्याचा शब्द घेतला.त्यांच्या या तत्परतेमुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.या दौऱ्यात महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख बाळासाहेब कांबळे, युवा सेना जिल्हा संघटक साईराज अडगळे, युवा नेते मधुकर साठे आणि चेतन साठे प्रामुख्याने उपस्थित होते.विविध गावांमधील भेटींदरम्यान स्थानिक पातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षांचे जोरदार स्वागत केले.पाणीव मधुकर साठे,येथील कृष्णा खवळे व शुभम साठे;तरंगफळ येथील दादा बागाव, बाबा कांबळे,आकाश कांबळे व प्रतीक कांबळे,गारवड येथील सतीश साठे,हनुमंत साठे, आण्णा साठे व सनी साठे यांनी नियोजनात सक्रिय सहभाग घेतला.तसेच चांदापूर येथे श्री. कवळे साहेब,विजय कवळे व बापू लोखंडे,तर गोरडवाडी येथे राजू वायदंडे, तानाजी वायदंडे आणि उपसरपंच केंगार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom