महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या पाठपुराव्याला मोठे यश;

पोलीस महासंचालक सदानंद दाते व आयुक्त शिरीष जैन यांच्याकडून तातडीने आदेश जारी!

सोशल मीडियावरील ३१ वादग्रस्त लिंक्स ब्लॉक करण्याचे आदेश,पोलीस प्रशासनाकडून ‘मेटा’ कंपनीला पत्र!

प्रतिनिधी: अनुसूचित जाती (SC) उप-वर्गीकरण मुद्द्यावरून समाजात निर्माण होऊ शकणारे मतभेद आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता, ‘महाराष्ट्र विकास सेना’ पार्टीने केलेल्या मागणीची पोलीस प्रशासनाने अत्यंत गांभीर्याने दखल घेतली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पसरवले जाणारे वादग्रस्त वक्तव्य, आक्षेपार्ह फोटो आणि समाज विघातक मजकूर रोखण्यासाठी प्रशासनाने थेट पावले उचलली आहेत.या अंतर्गत इंटरनेटवरील अत्यंत संवेदनशील अशा ३१ वादग्रस्त लिंक्स तातडीने ब्लॉक करण्याचे आदेश देण्यात आले असून, या संदर्भात फेसबुक आणि इंस्टाग्रामची मातृकंपनी असलेल्या ‘मेटा’ (Meta) कंपनीला अधिकृत पत्र पाठवून कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे.पक्षाचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि या गंभीर विषयावर महाराष्ट्र विकास सेना पार्टीच्या वतीने दिनांक ८ जुलै रोजी पोलीस महासंचालकांना अधिकृत निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर, दिनांक १६ जुलै रोजी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते (DGP) यांनी महाराष्ट्र विकास सेना पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा पक्षप्रमुख किरण साठे यांना भेटीची वेळ दिली होती. या उच्चस्तरीय भेटीदरम्यान पक्षप्रमुख किरण साठे यांनी अनुसूचित जाती उप-वर्गीकरण मुद्द्यावरून समाजात तेढ निर्माण होऊ नये आणि शांतता राहावी, यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची आग्रही मागणी केली.शिष्टमंडळासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी तात्काळ दखल घेतली.त्यांनी राज्य गुप्तचर विभागाचे आयुक्त शिरीष जैन यांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.महासंचालकांच्या सूचनेनुसार,आयुक्त जैन यांनी तत्काळ राज्यातील सर्व पोलीस आयुक्त,पोलीस अधीक्षक आणि गुप्तचर यंत्रणांना वायरलेस संदेश जारी केला. या पत्राद्वारे सोशल मीडियावरील अफवा, प्रक्षोभक पोस्ट आणि समाजात फूट पाडणाऱ्या घटकांवर चोवीस तास बारीक लक्ष ठेवून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच वादग्रस्त वक्तव्य आणि फोटोंचा प्रसार रोखण्यासाठी थेट ‘मेटा’ कंपनीशी संपर्क साधून त्या ३१ आक्षेपार्ह लिंक्स ब्लॉक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.महाराष्ट्र विकास सेना पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष किरण साठे आणि त्यांच्या शिष्टमंडळाने केलेल्या या यशस्वी आणि समयसूचक पाठपुराव्यामुळे संभाव्य सामाजिक तेढ टळण्यास मोठी मदत झाली आहे. प्रशासनाने घेतलेल्या या तात्काळ भूमिकेमुळे महार, बौद्ध आणि मातंग समाजातून महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे व पक्षप्रमुख किरण साठे यांचे विशेष कौतुक केले जात आहे तसेच सर्व स्तरांतून समाधान व्यक्त होत आहे.पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि आयुक्त शिरीष जैन यांच्यासोबत झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीला महाराष्ट्र विकास सेना पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष किरण साठे यांच्यासह प्रदेश सचिव अनिल साठे, संपर्क प्रमुख बाळासाहेब कांबळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे, माढा विधानसभा अध्यक्ष बिभीषण साठे, सतीश साठे, महेश साठे, विशाल साठे आणि सत्यवान लोंढे आदी प्रमुख पदाधिकारी व शिष्टमंडळ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom