
पंढरपूर चे गटशिक्षण अधिकारी दर्शन मेहता यांची महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या तक्रारीमुळे झाली उचलबांगडी !
गटशिक्षण अधिकारी दर्शन मेहता यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याशिवाय शांत बसणार नाही – राजेश खरे
प्रतिनिधी पंढरपूर तालुक्यातील RTE 2025-26 प्रवेश प्रक्रियेत प्रचंड गैरव्यवहार,पात्र,अपात्र विद्यार्थ्यांच्या यादीतील घोटाळा याची चौकशी करण्यात यावी आणि संबंधित प्रभारी गटशिक्षण अधिकारी यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र विकास सेना पार्टी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांनी दिनांक 22 जून 2026 रोजी मंत्रालयासमोर हिवाळी अधिवेशनावर थाळी नाद आंदोलन व बेमुदत आमरण उपोषण करण्यात केले होते सदर आंदोलनाची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा मंत्रालयाचे अवर सचिव अ.अ.कुलकर्णी यांनी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक (प्राथमिक) यांना पंढरपूर तालुक्याचे तत्कालीन गटशिक्षण अधिकारी दर्शन मेहता यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दर्शन मेहता यांनी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता केली असल्याचा आरोप राजेश खरे यांनी केला आहे.महाराष्ट्र सरकारने तक्रारीची दखल घेतली असून दर्शन मेहता यांच्या कारणाम्याचा पंचनामा केल्याशिवात आणि त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याशिवाय शांत बसणार नसल्याचे स्पष्ट करून महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या तक्रारी मुळेच दर्शन मेहता याची पंढरपूर तालुक्याच्या गटशिक्षण अधिकारी पदावरून उचलबांगडी झाली असल्याचे महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांनी सांगितले.