म.वि से.पार्टी आयोजित महाराष्ट्र गौरव सोहळ्यात कोल्हापूर जिल्ह्याची बाजी

राजहंस,मुजावर,सदाजय,कांबळे, नाईक नवरे यांना पुरस्कार प्रदान

प्रतिनिधी

महाराष्ट्र विकास सेना पार्टी आयोजित महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळा २०२६ हा कार्यक्रम अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथील आई श्री रिसॉर्ट या नामांकित हॉलमध्ये महाराष्ट्र विकास सेना पार्टी चे अध्यक्ष किरण साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.कोल्हापूर जिल्ह्यातील लेखक व इतिहासकार कपिल राजहंस यांना छत्रपती शाहू महाराज इतिहास भूषण,इचलकरंजी येथील समीर मुजावर यांना छत्रपती शिवाजी महाराज युवा उद्योजक,कोल्हापूर येथील काजल कांबळे यांना छत्रपती महाराणी ताराबाई समाजभूषण,तुषार नाईक नवरे यांना उत्कृष्ट दिग्दर्शक,रविराज सदाजय यांना उत्कृष्ट गायक व संगीतकार असे पुरस्कार पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष किरण साठे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी त्यांच्या क्षेत्रात स्वतःला झोकून देवून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला असल्याचे किरण साठे यांनी म्हटले आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील पाच मान्यवरांना पुरस्कार देण्यात आला.पहिल्याच पुरस्कार प्रदान सोहळ्यात कोल्हापूर जिल्ह्याने बाजी मारल्याचे पहायला मिळाले.

यावेळी महाराष्ट्र विकास सेना पार्टी चे प्रदेश सचिव अनिल साठे,संपर्क प्रमुख बाळासाहेब कांबळे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे,माळशिरस तालुका अध्यक्ष धनाजी पाटील,नेते बापूसाहेब वाघमारे,युवा सेना जिल्हा संघटक साईराज अडगळे,युवा सेना माळशिरस तालुका अध्यक्ष आदित्य काकडे, इंदापूर तालुका अध्यक्ष राजेंद्र चोरमले,पंढरपूर तालुका अध्यक्ष किरण घाडगे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र विकास सेना पार्टी माळशिरस तालुक्याच्या वतीने करण्यात आले होते. प्रस्तावना अनिल साठे यांनी केली.सूत्रसंचालन अनिता गायकवाड यांनी केले तर आभार बाळासाहेब कांबळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom