
महिला आघाडीच्या पंढरपूर तालुका उपाध्यक्षपदी सौ लक्ष्मी धोत्रे यांची निवड
भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडी पंढरपूर तालुका उपाध्यक्ष सौ लक्ष्मी धोत्रे यांचा व त्यांच्या शेकडो समर्थक महिला कार्यकर्त्यांचा महाराष्ट्र विकास सेना पार्टीमध्ये राष्ट् अध्यक्ष तथा पक्षप्रमुख किरण साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश घेण्यात आला.यावेळी महाराष्ट्र विकास सेना पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांच्या नेतृत्वाखाली या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पक्षप्रवेशाचा कार्यक्रम अकलूज येथे आयोजित करण्यात आला होता.यावेळी महाराष्ट्र विकास सेना पार्टीचे पंढरपूर तालुका अध्यक्ष किरण घाडगे,युवा सेना जिल्हा संघटक साईराज अडगळे,करकंब शहर प्रसिद्धी प्रमुख धीरज शिंदे,अकलूज शहर संघटक चेतन साठे,माळखांबी शहराध्यक्ष महादेव साठे,शिवाजी शिंदे उपस्थित होते.सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी काम करत असताना भारतील जनता पार्टीमध्ये काम करू दिले जात नाही,असा आरोप महिला आघाडीच्या सौ लक्ष्मी धोत्रे यांनी केला.महाराष्ट्र विकास सेना पार्टीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी सतत काम केले जात आहे,त्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी पार्टीच्या माध्यमातून पाठपुरावा केला जात आहे.महाराष्ट्र विकास सेना पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष किरण साठे हे सर्वसमावेश नेतृत्व असल्याने आणि ते पुरोगामी महाराष्ट्रच्या विचार वाचविण्यासाठी काम करीत असून सर्व समाजातील घटनांना बरोबर घेऊन काम करीत आहेत तसेच त्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना कामाची पावती दिली जात असल्याचे पाहून आणि त्यांच्या विचाराने व काम करण्याच्या पद्धतीला प्रेरित होऊन महाराष्ट्र विकास सेना पार्टी मध्ये प्रवेश केला असल्याचे सौ लक्ष्मी धोत्रे यांनी सांगितले.पक्षप्रवेश केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र विकास सेना पार्टीच्या पंढरपूर तालुका उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.पार्टीने दिलेली जबाबदारी सक्षमपणे आणि निष्ठेन पार पाडीन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष किरण साठे यांनी त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.