संभाजी ब्रिगेडचे किरण घाडगे यांचा मविसे पक्षात प्रवेश!पंढरपूर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती

संभाजी ब्रिगेडचे किरण घाडगे यांचा मविसे पक्षात प्रवेश!पंढरपूर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती

प्रतिनिधी :: करकंब

महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी ब्रिगेडचे पंढरपूर तालुका उपाध्यक्ष किरण घाडगे यांनी पक्षप्रमुख किरण साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.किरण घाडगे हे मूळ करकंब गावचे रहिवाशी आहेत.यावेळी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे प्रदेश सचिव अनिल दादा साठे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे,मविसे तालुक्याचे नेते बापूसाहेब वाघमारे, आंबेडकर चौक शाखा अध्यक्ष किरण खंडागळे,युवा सेना जिल्हा संघटक साईराज अडगळे,युवा सेना अकलूज शहर संघटक चेतन साठे, उपस्थित होते.किरण घाडगे यांनी संभाजी ब्रिगेडमध्ये गेली नऊ वर्षे काम केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न डॉ आण्णाभाऊ साठे यांच्या पुरोगामी विचारला सर्वस्व मानून त्यांनी काम केले आहे. पक्षप्रमुख किरण साठे हे महाराष्ट्र राज्यात पुरोगामी विचाराने पक्ष चालवत असून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी सरकारशी दोन हात करीत आहेत,आणि महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून पुरोगामी विचार पेरण्याचे काम करीत असल्याने तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाची जाण असणारा नेता आहे. म्हणून त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन पक्षप्रवेश करीत असल्याचे किरण घाडगे यांनी सांगितले. तसेच पक्षाने पंढरपूर तालुका अध्यक्ष पदाची दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून सर्वसामान्य नागरिकांना पदाच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी सदैव कटिबद्ध राहील असे श्री घाडगे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom