
रणजितसिंह जाधव,चंद्रकांत जाधव, धनाजी जाधव यांची उमेदवारी ठरतेय लक्षवेधी
प्रतिनिधी: पिलीव जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी कडून चंद्रकांत जाधव तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून रणजीतसिंह जाधव आणि महाराष्ट्र विकास सेना पक्षाकडून माळशिरस तालुका अध्यक्ष धनाजी जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महाराष्ट्र विकास सेना पक्षाची भूमिका किंगनेकर ची ठरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे तालुकाध्यक्ष धनाजी पाटील हे गेले पंधरा वर्षे राजकारण समाजकारणामध्ये सक्रियपणे काम करत असून महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची तालुक्यांमध्ये ओळख आहे त्यांच्या उमेदवारीने जिल्हा परिषदे गटामध्ये निवडणुकीचे वातावरण तापल आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे उमेदवार रणजितसिंह जाधव यांनी माळशिरस पंचायत समितीचे सदस्य म्हणून कामकाज पाहिले आहे त्यामुळे त्यांना राजकारणाचा दांडगा अनुभव आहे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार चंद्रकांत जाधव यांनीही निवडणुकीमध्ये उडी घेतली असल्याने या निवडणुक चुरशीने होणार असल्याची शक्यता पिलीव जिल्हा परिषद गटांमध्ये वर्तवली जात आहे.महाराष्ट्र विकास सेना पक्षाची भूमिका किंगमेकची ठरणार असल्याचे उमेदवार धनाजी जाधव यांनी सांगितले.