
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कामगार मंत्री आकाश फुंडकर यांना निवेदन
प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस व कामगार मंत्री आकाश फुंडकर यांना महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख किरण साठे यांनी दिनांक 12 सप्टेंबर रोजी मंत्रालयात जाऊन त्यांच्या कार्यालयात निवेदन दिले आहे.दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र सरकारने खाजगी क्षेत्रासाठी कामाचे तास वाढवण्याचा घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाने खाजगी कंपन्या आणि कारखान्यांमधील दैनिक कामाचे तास 9 वरून 12 तास आणि दुकानांमधील कामाचे तास 8 वरून 12 तास करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामध्ये कामगारांचे शोषण होणार आहे.आणि खाजगी कंपन्या आणि कारखाने यांचे भले होणार आहे.त्यामुळे सरकारने कामगारांचे हित न पाहता खाजगी कंपन्या आणि कारखाने यांचेच हित पाहिले असून सर्वसामान्य कामगारांना याचा नाहक त्रास सहन करावा लागणार आहे,त्यांच्या आरोग्याचा विचार न करता सरकाने हा घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.
चौकट
मूठभर मालकांना खुश करण्यासाठी हा निर्णय
खाजगी कंपन्या व कारखान्यामधे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेळेमध्ये वाढ करून त्यांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचा प्रकार राज्य सरकारने केला असून त्यांच्या मजबुरीचा फायदा सरकार घेवू पाहत आहे,मूठभर खाजगी कंपन्या व कारखान्याच्या मालकाना खुश करण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे,मात्र निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा अन्यथा महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने कामगार संघटना यांना बरोबर घेऊन राज्यभर रान पेटवले जाईल.
किरण साठे
पक्षप्रमुख महाराष्ट्र विकास सेना