
अकलूज नगरपरिषद मध्ये मुख्याधिकारी यांची नियुक्ती करण्याची मागणी,,,
अन्यथा आझाद मैदान येथे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे,गरविकास विभागाचे प्रधान सचिव,अवर सचिव यांना महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने मंत्रालयात त्यांच्या कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष निवेदन दिले आहे.निवेदनात अकलूज येथील नगरपरिषदमध्ये मुख्याधिकारी यांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.
अकलूज नगरपरिषद येथे कार्यरत असलेले श्री दयानंद गोरे यांची मे महिन्यामध्ये बदली करण्यात आली असून त्यांची बदली झाल्यापासून या नगर परिषदेमध्ये पूर्ण वेळ मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही या नगर परिषदेचा कार्यभार पाहण्यासाठी सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला असून यामुळे अकलूज नगर परिषद मध्ये पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत असून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी अकलूज नगर परिषदेमध्ये पूर्णवेळ मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावीअशी मागणी करण्यात आली आहे. तसेच तात्काळ नियुक्ती न केल्यास मंत्रालयासमोर आझाद मैदान येथे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.