
महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे मुख्यमंत्री,गृहमंत्री यांना निवेदन
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख किरण साठे यांनी निवेदन दिले आहे.निवेदनात राज्यातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना २४ तासावरून ८ तास कामांची वेळ करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र राज्यातील सर्वात महत्वाचे खाते असलेल्या पोलीस खात्यामध्ये काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना २४ तास काम करावे लागते आहे.इतर विभागात ८ तास काम करावे लागते,तसेच इतर विभागाला आठवड्यातून फक्त पाच दिवस कामाचे आहेत,मात्र पोलिस अधिकारी व कर्मचारी २४ तास काम करावे लागते. त्यामध्ये त्यांच्या संसाराकडे,त्यांच्या आई,वडील,मुले यांच्याकडे लक्ष देण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळत नाही,त्यांचे घरातील इतर सर्व गोष्टी कडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडील विभागात मात्र अधिकारी व कर्मचारी हे ८ तास काम करून आपल्या कुटुंबातील सर्व सदस्य यांच्याबरोबर आनंदात राहतात,त्याच्या उलट पोलिस खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांची परिस्थिती आहे.त्यामुळे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या कुटुंबाला पुरेसा वेळ देण्यात यावा,यासाठी त्यांच्या कामाचे तास कमी करून ८ तास करण्यासाठी शासन निर्णय पारित करण्यात यावा. अशी मागणी महाराष्ट्र विकास सेना पक्षाने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्याकडे केली आहे.