आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त माळेवाडी अकलूज येथे विद्यार्थ्यांना वह्या वाटप

डॉ.श्रद्धा जवंजाळ यांच्याकडून मविसे पक्षाच्या सामाजिक कार्याचे कौतुक….

प्रतिनिधी : अकलूज: साहित्यरत्न डॉ आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने 10,000 हजार वह्याचे वाटप करण्यात येणार आहे,त्यांचा पहिला टप्पा म्हणून माळेवाडी अकलूज येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पिंक रेवोल्युशनच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा डॉ.श्रद्धा जवंजाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते वह्या वाटपाचा कार्यक्रम पार पडला.यावेळी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे प्रदेश सचिव अनिल साठे,संपर्क प्रमुख,बाळासाहेब कांबळे,माळशिरस तालुका कार्याध्यक्ष राहुल खंडागळे,युवा सेना जिल्हा संघटक साईराज अडगळे,एम एस इ बी चे श्री कांबळे साहेब,माळेवाडी शाखेचे मार्गदर्शक बंडू कांबळे दत्ता जाधव,यशवंत खंडागळे,अजय अडगळे,ईश्वर अडगळे व जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक,शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते.महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या सामाजिक कार्याचे डॉ श्रद्धा जवंजाळ यांनी कौतुक केले.हा पक्ष गोरगरीब जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटत असल्याचे त्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom