
माळशिरस आणि सदाशिव नगर येथे कार्यक्रम संपन्न
प्रतिनिधी: साहित्यरत्न डॉ आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत १०,००० हजार वह्या वाटप करण्याचा संकल्प पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.त्याच पार्श्वभूमीवर माळशिरस मधील आदर्श प्राथमिक कन्या शाळा माळशिरस,सदाशिवनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगताप वस्ती सदाशिव नगर या जिल्हा परिषदेच्या शाळेत युवा सेना महाराष्ट्र विकास युवा सेना तालुका उपाध्यक्ष दीपक भाऊ कांबळे सदाशिवनगर शाखा अध्यक्ष ऋतिक नवगिरे उपाध्यक्ष पुष्पक भोसले पुरंदावडे शाखा अध्यक्ष यश ओवाळ उपाध्यक्ष भैया मोहिते माळशिरस शाखाध्यक्ष सचिन कांबळे उपाध्यक्ष रोहन कांबळे व आतिश कांबळे सुरज कांबळे अरुण मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत वह्या वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते.