
साहित्यरत्न डॉ आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रम
जेवणासह,चित्रकला,रांगोळी स्पर्धा,१०,००० वह्या वाटपाचा कार्यक्रम.
प्रतिनिधी : साहित्यरत्न डॉ.आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख किरण साठे यांच्या मार्गदर्शनाखाली १ ऑगस्ट रोजी अकलूजमधील साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या सर्व अनुयायांना पक्षाच्या वतीने स्मारकासमोरील जूने एसटी स्टँड येथे जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.तसेच जयंतीच्या निमित्ताने माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या १०,००० हजार विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.त्याच्या पहिल्या टप्पाची सुरुवात माळेवाडी अकलूज आणि पिरळे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये वह्या वाटप करून करण्यात येणार आहे.तसेच जेवणाच्या कार्यक्रमाचे आणि वह्या वाटप कार्यक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे.तसेच चित्रकला स्पर्धा,रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून जयंतीनिमित्त उपक्रम राबवण्यात आले आहेत.

