अकलूजमधील रोडरोमिओंचा बंदोबस्त करा—राष्ट्रवादी काँग्रेस

अकलूजमधील रोडरोमिओंचा बंदोबस्त करा—राष्ट्रवादी काँग्रेस

प्रतिनिधी–अकलूज—अकलूजमधील सदाशिवराव माने विद्यालय सदूभाऊ चौक व माळेवाडी अकलूज येथील स.म.श.मो.पा.महाविद्यालय येथे असलेल्या रोडरोमिओंचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा आशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी अकलूज पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री निंबाळकर यांना दिले आहे.
यावेळी बहुजन ब्रिगेडचे माढा लोकसभा अध्यक्ष सोमनाथ शेळके,आनंद मिसाळ,महावीर पारसे,गणेश शिंदे,अंकुश धाइंजे, इमरान मुलाणी,रफिक शेख,इत्यादी उपस्थित होते.

सदर निवेदनात नमूद केले आहे की,सदाशिवराव माने विद्यालय सदुभाऊ चौक येथे शाळा भरताना व सुटताना येणाऱ्या मुलींना ब्लड बँक गणेश नगर,शिवरत्न मोटर्स,रूपा कॉर्नर,सत्कार हॉटेल,या ठिकाणी थांबून मुलींना त्रास देण्याचे काम हे रोडरोमिओ करताना दिसतात, त्याचप्रमाणे माळेवाडी येथील स.म.श.मो.पा. महाविद्यालयात शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींना महाविद्यालय भरताना व सुटताना त्या महाविद्यालयाच्या बाहेरच्या बाजूला थांबून हे रोडरोमिओं त्रास देताना दिसतात त्यांचा बंदोबस्त त्वरित आपल्या विभागामार्फत करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केली आहे,अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रोडरोमिओंचा योग्य तो बंदोबस्त करून त्यांना आपल्या पोलीस स्टेशनमध्ये जमा केले जाईल असा इशारा जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom