अकलूजमधील कुरेशी मोहल्ला येथील बेकायदेशीर कत्तलखाने बंद करा –सचिन मोरे

अकलूजमधील कुरेशी मोहल्ला येथील बेकायदेशीर कत्तलखाने बंद करा –सचिन मोरे

प्रतिनिधी—अकलूज—अकलूजमधील कुरेशी मोहल्ला येथे बेकायदेशीररित्या जनावरांची कत्तल करून जे कत्तलखाने चालविले जातात ते त्वरित बंद करण्यात यावे या मागणीसाठी बहुजन ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन मोरे यांनी अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री निंबाळकर साहेब यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.

ह्या बेकायदेशीर कत्तल खाण्यामुळे या परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य पसरलेले असून या कत्तल केलेल्या जनावराच्या मांसाची दुर्गंधी हवेमध्ये पसरली जात असून या दुर्गंधी मुळे जनसामान्यांना अनेक आजराला सामोरे जावे लागत आहे, या कत्तल खाण्यामुळे या परिसरामध्ये अनेक मोकाट कुत्रांचा वावर वाढलेला दिसून येत आहे,अनेक कुत्रांनी सर्वसामान्य माणसाला चावा घेतला असल्याचे दिसून येत आहे.

हा चालविला जाणाऱ्या कत्तल खाण्याला अकलूज ग्रामपंचायत ने कोणत्याही प्रकारची परवानगी किंवा न हरकत दाखला दिलेला नाही,तरीही हे कत्तल खाने कुणाच्या आशीर्वादाने चालू आहेत असा प्रश्न बहुजन ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन मोरे यांनी उपस्थित केला आहे,आणि हे बेकायदेशीर कत्तल खाने चालविणाऱ्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करून ते कत्तलखाने बंद न केल्यास बहुजन ब्रिगेड संघटनेच्या वतीने दिनांक १७ फेब्रुवारी२०२० रोजी अकलूज पोलीस स्टेशन समोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.यावेळी बहुजन ब्रिगेडचे माळशिरस तालुका संघटक सागर वाघमारे,संतोष भोसले,ऋषी चव्हाण इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom