
मळोली ते निमगाव रस्त्याच्या कामाची चौकशी करावी या मागणीसाठी किरण साठे यांचे उद्या अकलूज येथे आंदोलन
प्रतिनिधी—निमगाव–मळोली ते निमगाव या रस्त्याच्या कामाची चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर त्वरित कारवाई करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ढेपे यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मळोली ते निमगाव रस्त्याच्या कामांमध्ये मोठया प्रमाणावर अनियमितता असून या कामामध्ये वापरले जाणारे मटेरिअल निकृष्ठ दर्जाचे असून हे काम इस्टीमेंट मध्ये असलेल्या नियम,अटी,शर्ती ला अनुसरून होत नसल्याची शक्यता आहे,त्यामध्ये मोठया व फोडीव खडीचा वापर मोठया प्रमाणात होत असून,त्या कामामध्ये खडी क्रशर च्या खडीच्या माध्यमातून तयार केलेल्या खडीचा वापर होणे गरजेचे असताना ती वापरत नसल्याचे दिसून आले आहे, त्याचप्रमाणे या रस्त्याच्या कामामध्ये वापरण्यात येणारे डांबर ही निकृष्ठ दर्जाचे असल्याची दाट शक्यता आहे,त्यामुळे या कामाची चौकशी करून दोषी आढळणाऱ्या संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर त्वरित कारवाई करावी या मागणीसाठी 12 फेब्रुवारी2020 रोजी पासून शासकीय वेळेमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.

चौकट
कोणत्याही परिस्थितीत उद्याचे आंदोलन हे होणार आहे,संबंधित अधिकारी हे या कामाचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराला पाठीशी घालत आहेत,ह्या कामाची चौकशी करून जोपर्यंत ह्या ठेकेदारावर व संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई केली जात नाही,तोपर्यंत मी हे आंदोलन थांबवणार नाही,या प्रश्नासाठी व संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यासाठीच्या मागणीसाठी २० फेब्रुवारी २०२०रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता पुणे यांच्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपात आंदोलन करणार आहे