गुजरात इन्फोटेक कंपनीच्या विरोधात महाराष्ट्र विकास सेना आक्रमक

गुजरात इन्फोटेक कंपनीच्या विरोधात महाराष्ट्र विकास सेना आक्रमक

गुजरात इन्फोटेक कंपनीला काळ्या यादीमध्ये टाकण्याच्या मागणीसाठी १३ मे ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन

कारवाई न झाल्यास महाराष्ट्र विकास सेना करणार मंत्रालयासमोर १९ मे पासून बेमुदत आमरण उपोषण

मा.जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू समिती सोलापूर जिल्हा यांना महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने निवेदन देवून गुजरात इन्फोटेक लि. अहमदाबाद कंपनीवर काळ्या यादीमध्ये टाकण्याची कारवाई करून त्यांचा ठेका रद्द करण्याची मागणी केली आहे.तसेच दिनांक १३/५/२०२५ रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पत्र दिनांक १२/१२/२०२४,(तातडीचे विधानसभा तारांकित प्रश्न) दिनांक -०६/०३/२०२५ रोजी गुजरात इन्फोटेक लि अहमदाबाद कंपनीला दोन वेळा पत्रव्यवहार करून तालुक्याचे नाव,एकूण कंत्राटी कामगार, सेतू केंद्र चालविणाऱ्या संस्थेचे नाव,सदर संस्थेमार्फत कार्यरत असलेल्या प्रत्येक कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नाव,सदर कंत्राटी कर्मचाऱ्यांचे एकूण वेतन,सदर कर्मचाऱ्यांच्या वेतनामधून वजा होणारी रक्कम व त्याचा तपशील,सदर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या खाती प्रत्येक्षात जमा होणारे वेतनाची रक्कम याची माहिती मागविण्यात आली आणि माहिती तात्काळ न दिल्यास काळ्या यादीमध्ये टाकण्याचा लेखी इशारा देण्यात आला मात्र गुजरात इन्फोटेक लि.अहमदाबाद कंपनीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्राला केराची टोपली दाखवली. त्यांचा आदेश झुगारून लावला.असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या पत्राला केराची टोपली दाखवणाऱ्यावर व त्यांचा आदेश झुगारून लावणाऱ्या कंपनीला काळ्या यादीमध्ये टाकण्यात यावे आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सन्मानार्थ अर्धनग्न आंदोलन करण्यात आले,त्यानंतर ०७/४/२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथील महसूलचे तहसीलदार श्री दिनेश पारगे यांच्याकडून सोलापूर जिल्हा समन्वयक गुजरात इन्फोटेक लि.अहमदाबाद यांना पत्र पाठवून दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले मात्र त्यांनी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशाला झुगारून वेळेत अहवाल केला नाही,या कंपनीची मुजोरी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. करारनामा झालेला असताना त्यामधील अटी,शर्ती संबंधित कंपनीला पाळने बंधनकारक असताना कंपनीने त्या पाळल्या नाहीत,कारारनाम्यातील अटी,शर्तीचा भंग केल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने कंपनीला पाठीशी न घालता तात्काळ काळ्या यादीमध्ये टाकण्याची कारवाई करावी आणि त्यांचा ठेका तात्काळ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी दिनांक १३/५/२०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र स्वरूपात थाळीनाद आंदोलन करण्यात येणार आहे.तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाने या कंपनीवर काळ्या यादीमध्ये टाकण्याची आणि ठेका रद्द करण्याची कारवाई न केल्यास १९/५/२०२५ रोजी मंत्रालयासमोर अमारण उपोषण करण्यात येणार आहे असल्याचा महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom