
कण्हेर येथे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या शाखेचे उदघाटन
महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माळशिरस तालुक्यातील मौजे कण्हेर येथे पक्षाच्या शाखेचे उदघाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून माळशिरस तालुक्यामध्ये गाव तिथे शाखा आणि घर तिथे कार्यकर्ता हे अभियान सुरू करण्यात आले आहे या अभियानाला माळशिरस तालुक्यामध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्षाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.यावेळी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे प्रदेश सचिव अनिल साठे,पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख धनाजी साठे,माळशिरस तालुका अध्यक्ष बापूसाहेब वाघमारे,कार्याध्यक्ष राहुल खंडागळे, सरचिटणीस सतीश साठे,जेष्ठ नेते उमाजी आण्णा मिसाळ,युवा सेना जिल्हा संघटक साईराज अडगळे,तालुका उपाध्यक्ष दीपक कांबळे, नितीन मिसाळ,शाखा अध्यक्ष सागर मिसाळ,हनुमंत धाइंजे,खजिनदार लखन लांडगे,संघटक बापू मिसाळ,सचिव बापू होनमाणे,विठ्ठल वाघमारे,इस्लामपूर शाखेचे मार्गदर्शक विकास कांबळे, मनोज काशिद,साहेबराव शिंदे,सागर होणमाने,शुभम वाघमारे,अण्णा होणमाने, दादा धाईंजे, विजय धाईंजे,उमेश धाईंजे,आप्पा लोखंडे, गोरख लोखंडे,यांच्यासह असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाखा उदघाटन प्रसंगी पक्षप्रमुख किरण साठे यांनी शाखेमध्ये सामील झालेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले सर्वसामान्य जनतेला महाराष्ट्र विकास सेना पक्षाची शाखा हे आपले हक्काचे प्रश्न सोडवणारे व्यासपीठ आहे,अशा प्रकारची भावना सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे असे काम करण्याच्या सूचना त्यांनी मनोगत व्यक्त करताना दिल्या.