राज्यपाल कार्यालयाचे महसूल विभागाचे अवर सचिव यांना आदेश

माळीनगर आणि सवतगव्हान भूसंपादनाचे प्रकरण थेट राज्यपाल कार्यालयात

राज्यपाल कार्यालयाचे महसूल विभागाचे अवर सचिव यांना आदेश

संत तुकाराम महाराज पालखी मार्गामध्ये माळीनगर व सवतगव्हान गावातील बधितांची होणार चौकशी

सर्व्ह मध्ये समावेश झाला नसताना खोटी कागदपत्रे सादर करून लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई

प्रतिनिधी : मुंबई : संत तुकाराम महाराज पालखी महामार्गामध्ये माळशिरस तालुक्यातील मौजे माळीनगर आणि सवतगव्हान हद्दीमधील भूसंपादन झालेल्या व त्याचा लाभ मिळालेल्या मोबदल्याची चौकशी करण्यात यावी या मागणीचे निवेदन महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे प्रदेश सचिव अनिल साठे यांनी महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल श्री.सी.पी.राधाकृष्णन यांना १२/०२/२०२५ रोजी निवेदन देवून चौकशी करण्याची मागणी करून ठिय्या आंदोलन करण्याची मागणी केली आहे.

संत तुकाराम महाराज पालखी महामार्गामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अनेकांच्या जमिनी संपादित झालेल्या असून त्यापैकी मौजे माळीनगर आणि मौजे सवतगव्हाण मधील शेतकऱ्यांची जमीन बांधकाम, घरे संपादित झालेली असून त्यांना मोबदला देण्यात आलेला आहे. संबंधित दोन्ही गावामधील जमीन किती संपादित झाली आहे ? संपादित होण्याच्या अगोदर असलेली एकूण जमीन बांधकामे,घरे,आणि संपादित झाल्यानंतर आणि त्याचा मोबदला घेतल्यानंतर प्रत्येक्ष शिल्लक असलेली जमीन,किंवा बांधकामे व घरे,पत्रा शेड किती होते व ते पाडतानाचे जी पी एस मॅप द्वारे घेतलेले फोटो ? याची चौकशी करण्यात यावी.असे निवेदनात नमूद केले आहे.

संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता असून काही लोकांच्या जमिनीचे मूल्यांकन कमी तर काहींचे मूल्यांकन जास्त करण्यात आलेचे प्रकार घडले आहेत,त्यामुळे माळीनगर व सवतगव्हाण येथील भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना दिलेला मोबदला त्यांचे जेवढे क्षेत्र गेले आहे,तेवढाच मोबदला दिला आहे का ? याची चौकशी करण्यात यावी तसेच भूसंपादन व मोबदला वाटपामध्ये अनियमितता असल्याचे सिद्ध झाल्यास तात्काळ जबाबदार असलेल्या अधिकारी व खोटे भूसंपादन झाल्याचे दाखवून मोबदला घेणाऱ्या शेतकरी व लाभधारकावर फौजदारी गुन्हा दाखल करून शासनाची फसवणूक करून मोबदल्याच्या स्वरूपात घेतलेले पैसे व्याजासह वसूल करण्यात यावेत यासाठी आपण तात्काळ चौकशीचे आदेश द्यावेत अशी राज्यपाल यांच्याकडे अनिल साठे यांनी मागणी केली होती.मागणीच्या अनुषंगाने राज्यपाल कार्यालयाने १३/०२/२०२५ रोजी महसूल विभागाचे अवर सचिव यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे माळीनगर व सवतगव्हान गावातील खोटी घरे, बांधकामे दाखवून लाभ घेतला आहे आणि शासनाची फसवणूक केली आहे,त्यांची चौकशी होवून संबंधितांवर कारवाई होणार हे मात्र नक्की.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom