
राज्यपाल/राजभवन कार्यालय ऍक्शन मोडवर
वनपाल बदली प्रकरणाची चौकशी करण्याचे वन विभागाचे अवर सचिव यांना आदेश..
महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांना महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी निवेदन देवून मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक विभाग पुणे यांच्या कार्यालयातून दिनांक ३०/०८/२०२४ रोजीच्या कक्ष३(१(आस्था)ए-१०७/२०२४-२५,पुणे ४११०१६ या पत्राच्या अनुषंगाने वनपाल संवर्गातील कर्मचारी यांच्या झालेल्या सर्व बदल्या व पद स्थापना (वनपाल सागर चुटके,प्रमोद रासकर)रद्द करणेबाबत व सर्व बदली प्रकरणाची चौकशी करण्यात यावी या मागणीचे निवेदन सादर केले होते.तसेच या मागणीची दखल घेवुन महाराष्ट्र शासनास तात्काळ कार्यवाहीचे आदेश न दिल्यास दिनांक २०/०२/२०२५ रोजीच्या बेमुदत आमरण उपोषण करण्याचे निवेदनात नमूद केले होते.त्याची दखल घेवून राज्यपाल यांच्या राजभवन कार्यालयाच्या सचिवालयातून राज्यपालांच्या अवर सचिव करुणा वावडणकर यांनी महाराष्ट्र शासनाचे वन विभागाचे अवर सचिव यांना कार्यवाही साठी आदेशित केले आहे.त्यामुळे ३०/०८/२०२४ रोजी करण्यात आलेल्या वनपाल बदल्यांची चौकशी होणार असून या मध्ये दोशी असणाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्याची कार्यवाही करण्यात येईल अशी आशा आहे आणि ज्यांच्या बदल्या शासन निर्णयाचे उल्लंघन करून करण्यात आल्या आहेत अशा रद्द करण्यात याव्यात आणि ज्या वनपरिक्षेत्र अधिकारी आणि उपवनसंरक्षक अधिकारी यांनी मुख्य वनसंरक्षक यांच्या कार्यालयात बेकायदेशीर प्रस्ताव सादर केले असतील आशा सर्वांवर कारवाई करण्यात यावी असे पक्षप्रमुख किरण साठे यांनी सांगितले.