
निरा नदी बचाव आंदोलनाला अकलूजमध्ये सुरुवात
कारवाई होत नाही तोपर्यंत बेमुदत आंदोलन करणार – अनिल साठे
प्रतिनिधी : महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूमधील निरा नदीमध्ये व पुरदावडे गावच्या हद्दीत दूषित पाणी सोडणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने प्रदेश सचिव अनिल साठे यांच्या नेतृत्वाखाली अकलूज मधील साहित्यरत्न डॉ आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर ठिय्या व थाळी नाद आंदोलन सुरु करण्यात आले आहे.यावेळी राज्य संपर्क प्रमुख बाळासाहेब कांबळे,युवा सेना जिल्हा संघटक साईराज अडगळे,तालुका अध्यक्षआदित्य काकडे,अकलूज शहराध्यक्ष अजित माने,बापू वाघमारे,प्रमोद जावीर विठ्ठल जावीर,किरण खंडागळे,सचिन शिंदे,सोमनाथ कुचेकर, उत्तम गुजर, अजय अडगळे,उमेश भाले संतोष गुळीक,शिवाजी गेजगे,लक्ष्मण चव्हाण,सुरज चव्हाण,सैलानी सय्यद,सुनील सावंत,विकास केसकर, अविनाश लोखंडे यांच्यासाह अनेकजण उपस्थित होते.
अकलूजमधील निरा नदी बचाव आंदोलन सुरू करण्यात आले आहे मात्र संबंधित विभागाचे अधिकारी यांनी आंदोलनाला भेट दिली नाही,निरा नदीमध्ये व तालुक्यातील पुरंदावडे हद्दीत दूषित पाणी सोडणाऱ्यावर कारवाईची मागणी केल्याने तालुक्यातील जनतेमध्ये दूषित पाणी सोडणारे कोण आहेत याची चर्चा रंगली आहे.आंदोलनाने अकलूजमधील जनतेचे लक्ष वेधून घेतले आहे.