कोल्हापूरला शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा – किरण साठे

कोल्हापूरमध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या शाखेचे उदघाटन

कोल्हापूरला शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा – किरण साठे

महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत तसेच पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर शहर शाखा स्थापन करण्यात आली.शाखेच्या फलकाचे अनावरण पक्षप्रमुख किरण साठे यांनी केले.कोल्हापूर युवा सेना विभाग प्रमुख पदी तेजस नाईकनवरे यांची निवड करण्यात आली.यावेळी राज्य सरचिटणीस अविराज माने,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे,युवा सेना सोलापूर जिल्हा संघटक साईराज अडगळे,युवा सेना अकलूज शहराध्यक्ष अजित माने,कोल्हापूर युवा सेना शहराध्यक्ष केदार लोखंडे, उपाध्यक्ष प्रथमेश यमकर शहर कार्याध्यक्ष रेहान शेख शहर शाखा सरचिटणीस सुमित नाईक नवरे,विजय पुजारी,निखिल कांबळे,स्वयम जाधव,प्रेम सिंगे,आर्यन वरक यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

कोल्हापूर शहराला छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा असून तो वारसा संपूर्ण राज्यात महाराष्ट्र विकास सेना पक्ष रुजविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मत किरण साठे यांनी व्यक्त केले.फुले,शाहू,आंबेडकर, आण्णाभाऊ साठे यांच्यासह राज्यातील क्रांतिकारी महामानव व थोर संतांच्या विचारांवर पक्ष चालत असल्याचे आहे. कोल्हापूर शहराच्या विकासामध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्षाचा नेहमीच सहभाग राहील असे आवर्जून साठेंनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom