
माळीनगर मधील दुरावस्थेच्या प्रश्नावर मविसे आक्रमक
११ फेब्रुवारी पासून बेमुदत आंदोलनाचा दिला इशारा
महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने माळीनगर येथील संग्राम नगर परिसरात असलेल्या गटारी व पाण्याच्या समस्येसाठी आक्रमक भूमिका घेवून ग्रामपंचायतचे उपसरपंच अतुल कांबळे यांना निवेदन दिले आहे.ग्रामपंचायतचा भोंगळा कारभार चालू असल्याचे राज्य संपर्क प्रमुख बाळासाहेब कांबळे यांनी निदर्शनास आणून दिले.यावेळी अमोल आईवळे परमेश्वर जावीर विठ्ठल जावीर महादेव देडगे कृष्णा कुंभार लखन जावीर सुनील केंगार नाईक नवरे सागर नाईक नवरे अजय अडगळे, बायडाबाई जावीर सुनिता गोरे ज्योती कांबळे उषा आडगळे सुमन जावीर शोभा गेजगे,वैशाली जावीर रेखा जावीर यावेळी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.निवेदनात नमूद मागण्यांवर तात्काळ निर्णय न घेतल्यास महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने येणाऱ्या अकरा तारखेला आंदोलन करण्याचा इशारा संपर्क प्रमुख बाळासाहेब कांबळे यांनी दिला आहे.