महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या मोर्चाला मिळाले यश

महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या मोर्चाला मिळाले यश

नगरपरिषदेने लेखी दिले लेखी आश्वासन

प्रतिनिधी : माळशिरस :

महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून अकलूज परिषदेला निवेदन देऊन महर्षी कॉलनीमधील अंतर्गत नवीन रस्ते करणे क्रांतीसिंह नगर (घरकुल )येथील नवीन अंतर्गत रस्ता करणे क्रांतिसिंह नगर (घरकुल) येथील नवीन अंतर्गत गटार करणे या मागण्यासाठी निवेदन दिले होते.सदर मागण्यांच्या बाबतीमध्ये तात्काळ कार्यवाही न केल्यास २६ जानेवारी रोजी अकलूज नगर परिषदेवरती मोर्चा काढण्याचा इशारा महाराष्ट्र विकास सेनेचे प्रदेश सचिव अनिल साठे,युवा सेनेचे जिल्हा संघटक साईराज आडगळे,माळशिरस तालुका अध्यक्ष आदित्य काकडे,युवा सेना अकलूज शहराध्यक्ष अजय माने,अविनाश लोखंडे,संतोष गुळीक,शिवाजी गेजगे,सूरज चव्हाण या सर्वांनी दिला होता.

महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या मोर्च्याची अकलूज नगर परिषदेने तात्काळ दखल घेतली असून नगर परिषदेने महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे प्रदेश सचिव अनिल साठे यांना लेखी पत्र काढून महर्षी कॉलनीतील अंतर्गत नवीन रस्ता करणे सदरचे काम हे जिल्हा नियोजन अंतर्गत प्रस्तावित करण्याची कारवाई चालू आहे,क्रांतिसिंह नगर घरकुल येथील अंतर्गत रस्ता करणे सदरच्या कामाची निविदा केलेली असून कार्यारंभ आदेश देण्याची कारवाई सुरू असून लवकरच काम सुरू करण्यात येईल तसेच क्रांतिसिंह नगर (घरकुल) येथील नवीन अंतर्गत गटार करणे सदरच्या कामाचे निविदा केलेली असून कार्यारंभ आदेश देण्याची कारवाई सुरू असून लवकरच काम सुरू करण्यात येईल अशा पद्धतीने लेखी स्वरूपात पत्र कळविले आहे.मोर्चाच्या अनुषंगाने सर्व मागण्यावरती कार्यवाही केल्याचे पत्र दिल्यामुळे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या मोर्चाला प्रचंड यश आहे.अकलूज परिसरामध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्ष हा सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाला स्वतःचा प्रश्न समजून प्रशासकीय यंत्राकडे पाठपुरावा करून ते सोडवण्यासाठी भविष्यात प्रयत्न करेल असे मत प्रदेश सचिव अनिल साठे यांनी व्यक्त केले.पक्षाच्या कामाचे कौतुक अकलूज शहरात होताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom