
माळशिरस तालुक्याचे आमदार सातपुते की जानकर ?
माळशिरस तालुक्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाकडून उत्तमराव जानकर व भारतीय जनता पार्टी कडून राम सातपुते हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते त्या निवडणुकीमध्ये उत्तमराव जानकर यांचा साडेसहा ते सात हजार मतांनी निसटता विजय झाला आहे, हा विजय उत्तमराव जानकर यांना मान्य नसून त्यांना अपेक्षित असे लीड या मतदारसंघात मिळाले नाही,त्यामुळे सद्या ते ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपर वरती मतदान घेण्याच्या मागणी वरती ठाम आहेत मात्र माळशिरस तालुक्यातील सत्ताधारी आणि विरोधक असलेले मोहिते पाटील व उत्तम जानकर एकत्र येऊन सुद्धा राम सातपुते यांना एक लाख दहा हजाराच्या आसपास मतदान झाल्याने सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येऊन ही त्यांची या निवडणुकीमध्ये म्हणावी अशी चांगली कामगिरी झाली नसून सत्ताधारी आणि विरोधक असलेल्या लोकांनी एकत्र येऊन सुद्धा म्हणावा असा इफेक्ट या निवडणुकीत झालेला दिसून येत नाही.
माळशिरस तालुक्यात आमदार म्हणून निवडून आलेले उत्तमराव जानकर हे फार निराश झालेले असून त्यांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे या मागणीसाठी केंद्रीय निवडणूक आयोग यांना पत्रव्यवहार केलेला असून त्यावरती सध्या तरी कोणताही निर्णय झालेला नसून ते निवडून येऊन सुद्धा खुश नसल्याचे या प्रकरणावरून दिसून येते,मात्र माळशिरस विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत होऊन सुद्धा अतिशय जोशाने आणि उत्साहाने पराभूत उमेदवार राम सातपुते तालुक्यातील जनतेच्या विविध प्रश्नांसाठी जनता दरबार घेवून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत असलेले दिसून येत आहेत.अकलूज परिसरामध्ये नव्याने निवड झालेले पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या निवडीचे फलक मोठ्या प्रमाणात लावल्याने अकलूज मधील वातावरण भारतीय जनता पार्टीमय झाल्याचे सध्यातरी डिजिटलच्या माध्यमातून दिसून येत आहे,निवडीचे फलक अकलूजमधील व तालुक्यातील जनतेचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत.भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असलेले व पराभूत झालेले उमेदवार राम सातपुते हे आमदार आहेत ? की उत्तमराव जानकर आमदार आहेत ? असा प्रश्न माळशिरस तालुक्यातील व विशेष करून अकलूजमधील सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे.