आंदोलनाच्या इशाऱ्याने जिल्हा प्रशासन खडबडून झाले जागे

मविसे पक्षाची मागणी जिल्हाधिकारी यांचा सकारात्मक प्रतिसाद

आंदोलनाच्या इशाऱ्याने जिल्हा प्रशासन खडबडून झाले जागे

दुष्काळी भागात उपाययोजना केल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

प्रतिनिधी : : महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख किरण साठे यांनी दिनांक ४/३/२४ रोजी सकाळी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री कुमार आशिर्वाद यांना निवेदन देवून सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी गावात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर आणि जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्याची मागणी केली होती.मागणीच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही न झाल्यास महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने जिल्हाभर आंदोलन उभा करण्याचा इशारा देण्यात आला होता.

महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या मागणीची दखल घेऊन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिनांक ४/३/२४ रोजी दुपारी पत्रकार परिषद घेवून प्रशासनाकडून करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली आणि दुष्काळी परिस्थितीत राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना संदर्भात जिल्ह्यातील जनतेला अवगत केले.पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ७४ कोटी ३५ लाख रुपयांचा आराखडा तयार केला आहे.यामध्ये विंधन विहिरी व नळ योजनांची दुरुस्ती,तात्पुरता पूरक नळ योजना,टँकरने पाणी पुरवठा, विंधन विहिरींचे अधिग्रहण, विहिरीतील गाळ काढणे आणि उजनी धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले असल्याचे व आदी कामांचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद यांनी दिली.

जिल्ह्यात सहा गावाना टँकर ने पाणीपुरवठा केला जात असल्याचे सांगून तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार तसेच प्रशासकीय यंत्रणेने तालुका पातळीवर टंचाईचा आढावा घेवून दोन दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अहवाल सादर करावा असे आवाहन उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी केले आहे.महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या मागणीला जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद यांनी प्रतिसाद देत यंत्रणा सुरू केली आहे.त्यांनी केलेल्या नियोजनाची माहिती जनतेला दिल्याने महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या मागणी यश मिळाले असून जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom