वनपाल अशोक नरुटे आणि अमोल पाचपुते यांची बदली रद्द करण्याची मागणी
अन्यथा २२ जानेवारीला मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन करणार – म.वि.से
प्रतिनिधी : नागपूर : शैलेश टेंभुर्णीकर प्रधान मुख्य वनसंरक्षक वनबल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर आणि शोमिता विश्वास अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक दुय्यम संवर्ग महाराष्ट्र राज्य नागपूर यांना भेटून महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी निवेदन दिले आहे.निवेदनात श्री अमोल पाचपुते वनपाल मोरगाव बारामती वनपरी मंडळ आणि श्री अशोक विठ्ठल नरुटे वनपाल इंदापूर वनपरिमंडळ इंदापूर वनपरिक्षेत्र प्रादेशिक पुणे वनविभाग येथे यांची नियमबाह्य तसेच बेकायदेशीर व चुकीची झालेली बदली तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.निवेदन प्रधान मुख्य वनसंरक्षक वनबल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर यांनी शैलेश टेंभुर्णीकर यांनी स्वीकारले.यावेळी राज्य कार्यकारणी सदस्य राजेश खरे उपस्थित होते.
श्री अशोक विठ्ठल ननरुटे हे पुणे वनवृत्तातील पुणे वनविभागात इंदापूर प्रादेशिक वनपरिक्षेत्रात २०१३-१४ मध्ये वनरक्षक या पदावर ती कळस या बिटावर हजर झाले व त्यांनी कामकाज पाहिले नंतर २०१६ – १७ मध्ये या बीटाची असलेले जंक्शन वनपरि मंडळ वनपाल पदावर पदोन्नती घेऊन वनपाल या पदावर त्यांची पदस्थापना झाली नंतर बदल्याबाबतचा शासन निर्णय २०१७-१८ नुसार श्री एन आर प्रवीण यांनी मे २०२३ मध्ये त्यांची सोलापूर जिल्ह्यातील सांगोला सामाजिक वनीकरण सांगोला वनपरिक्षेत्रात वनपाल या पदावर ती बदली केली,कारण त्यांचा वनपाल जंक्शन या पदावर सहा वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला होता त्यांची नियमानुसार बदल्याबाबतच्या २०१७ – १८ शासन निर्णयानुसार दोन पदावती पूर्ण झाल्यानंतर इतर शाखेमध्ये बदली करण्याची तरतूद असताना त्यांची बदली नियमानुसार झाली होती.असे निवेदनात नमूद केले आहे.
त्यांना पुन्हा इंदापूर तालुक्यात प्रादेशिक विभागात वनपाल वन परिमंडळ पदावर बदली देऊन ही बदली नियमाला धरून नसून यामध्ये अर्थपूर्ण संबंध,तडजोडी ठेवून बदलीचे नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीर त्यांची बदली वनपाल वन परिमंडळ इंदापूर येथे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रशासन दुय्यम संवर्ग महाराष्ट्र राज्य नागपूर यांचे येथील कार्यालयीन पत्र क्र.कक्ष.१०(२)/आस्था/३ प्र.क्र.-०४(२०२३-२०२४)/१३०५ दि.६/१२/२०२३ अन्वये करण्यात आलेली आहे ती तात्काळ रद्द करावी आणि शासकीय कर्मचारी बदल्यांचा अधिनियम २००५ अन्वये बदलीसाठी पात्र झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीसाठी एक वर्ष कमी कालावधी शिल्लक असेल तेव्हा बदल्या संदर्भातला शासन निर्णय २०१७ -१८च्या अनुषंगाने निश्चित बदली करता येते परंतु श्री नरुटे यांचा सेवानिवृत्ती कालावधी एक वर्षापेक्षा जास्तीचा आहे व तसे त्यांनी त्याच इंदापूर प्रादेशिक परिक्षेत्रा मध्ये सहा वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये म्हणजेच दोन पदावती प्रादेशिक शाखेत पूर्ण केल्या आहेत यापुढे त्यांना पुन्हा प्रादेशिक व्यतिरिक्त इतर वनविभागाच्या शाखेत बदली करण्यात यावी व झालेली बदली रद्द करण्यात यावी तसेच सदरची बदली ज्या अधिकाऱ्यांनी केली आहे त्यांनी चुकीच्या पद्धतीने बदली केल्याप्रसंगी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर १९७९ मधील तरतुदीनुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी.अन्यथा नागपूर कार्यलयाच्या विरोधात मुंबई येथील मंत्रालयासमोर २२/जानेवारी २०२४ रोजी आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.माहितीसाठी व पुढील कार्यवाहीसाठी मा.सुधीर मुनगंटीवार मंत्री वने महाराष्ट्र राज्य मा.वेणूगोपाल रेड्डी
प्रधान सचिव वने महाराष्ट्र शासन यांना निवेदनाच्या प्रति पाठविण्यात आल्या आहेत.
