महाराष्ट्र विकास सेना पक्षाची फलटण तालुक्यात एन्ट्री !

महाराष्ट्र विकास सेना पक्षाची फलटण तालुक्यात एन्ट्री !

विधानसभा अध्यक्षपदी शब्बीर शेख यांची तर उपाध्यक्षपदी सलीम शेख यांची निवड

महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांचा फलटण दौरा आयोजित करण्यात आला होता दौऱ्या दरम्यान फलटण तालुक्यातील आसू या गावामध्ये पक्षाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकी प्रसंगी महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या फलटण तालुका विधानसभा अध्यक्षपदी शब्बीर शेख यांची आणि फलटण विधानसभा उपाध्यक्ष पदी सलीम शेख यांची एक मताने निवड करण्यात आली त्यांना निवडीचे पत्र पक्षप्रमुख किरण साठे यांच्या हस्ते देण्यात आले.

महाराष्ट्र विकास सेना पक्षाची स्थापना झाल्यापासून पक्षप्रमुख आणि त्यांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षाच्या विस्तारासाठी स्वतःला झोकून देऊन काम करीत असल्याचे दिसून येत आहे.पाच ते सहा महिन्यापूर्वी स्थापन झालेल्या पक्षाचा विस्तार माढा लोकसभा मतदारसंघात जवळपास ८०% पूर्ण झाला आहे. प्रत्येक तालुक्यात पदाधिकारी निवडी आणि शाखा उदघाटन कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत,त्यांच्या कार्यक्रमाला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळते आहे. त्यामुळे महाराष्ट्र विकास सेना पक्षाची निवडणुकीत भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. महाराष्ट्र विकास सेना पक्ष उमेदवार देणार का ? याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.महाराष्ट्र विकास सेना पक्ष माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेत सामील झाल्यास महायुतीला फटका बसणार की महाविकास आघाडीला फटका बसणार हे निवडणुकीत उतरल्यानंतरच कळेल.माढा लोकसभा निवडणुकीत उतरण्यासाठी तर फलटण तालुक्यातील पदाधिकारी यांच्या निवडी केल्या नाहीत ना अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. पदाधिकारी निवडीने महाराष्ट्र विकास सेना पक्षाने फलटण तालुक्यात एन्ट्री केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom