स्वा.शे.संघटनेचे हनुमंत शिंदे यांचा मविसे पक्षात प्रवेश
शिंदेंची शेतकरी सेनेच्या इंदापूर तालुका अध्यक्षपदी निवड
प्रतिनिधी : बावडा : महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत बावडा येथे पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी राज्य समन्वयक अजित साठे,पत्रकार सचिन रणदिवे,महेंद्र साठे,रोहित वाघमारे,रफिक मुलाणी,वाल्मिक रणदिवे,उपस्थित होते.बैठकीचे आयोजन मविसेचे अविराज माने यांनी केले होते.यावेळी अविराज माने यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत शिंदे यांनी महाराष्ट्र विकास सेना पक्षात प्रवेश केला.त्यांची महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या शेतकरी सेनेच्या इंदापूर तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
शिंदेंनी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यरत राहून,शेतकऱ्यांचे व सर्वसामान्य जनतेचे सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नूतन तालुका अध्यक्ष हनुमंत शिंदे यांनी सांगितले.
यावेळी शंकर बोडके,आण्णा गायकवाड,संतोष काळे,गुरुदेव घोगरे, खंडेराव सुर्वे,भीमराव शिंदे,मेजर बाबासाहेब जाधव,सोमनाथ झंजे,सोमनाथ गायकवाड, शौकत मुलाणी यांच्यासह भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस,मनसे,पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी पक्षप्रवेश केला.
