नगराध्यक्षा अनिता लांडगे यांचा किरण साठे याच्या हस्ते सत्कार
प्रतिनिधी : नातेपुते : नातेपुते नगरपंचायत च्या नगराध्यक्ष पदी अनिता नंदू लांडगे यांची निवड झाल्याबद्दल बहुजन ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांनी नातेपुते येथे त्यांच्या निवासस्थानी जावून हार,शाल,गुलाब पुष्प देवून सत्कार केला.आणि पुढील वाटचालीस किरण साठे यांच्याकडून नगराध्यक्षा अनिता लांडगे यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी सत्कार प्रसंगी किरण साठे,मनसेचे अकलूज शहराध्यक्ष सुदाम आवारे,नंदू लांडगे,अनिल लांडगे,विनोद लांडगे,संदीप लांडगे,प्रशांत ठोंबरे,अमोल लांडगे, विशाल खुडे, रफिक सय्यद,आनंद मिसाळ,उपस्थित होते.

