माळशिरस ते पिलीव एसटी झाली चालू ! तरंगफळ येथे किरण साठेंचा सत्कार

माळशिरस ते पिलीव एसटी झाली चालू ! तरंगफळ येथे किरण साठेंचा सत्कार

प्रतिनिधी : माळशिरस : अकलूज मार्गे माळशिरस ते पिलीव एसटी चालू करण्यासाठी बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांनी पाठपुरावा केला होता,त्यांच्या पाठपुराव्यामुळे एसटी चालू झाली आहे.

माळशिरस मार्गे मोटेवाडी,तरंगफळ,चांदापुरी ते पिलीव एसटी चालू झाली असल्याने बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांचा तरंगफळ ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात सत्कार समारंभ आयोजित केला होता.किरण साठेंचा सत्कार सरपंच नारायण तरंगे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी ग्रामपंचायतचे माजी सदस्य बापू गोरड,लाला तरंगे,दादा बागाव, महावीर कांबळे ,डॉक्टर विकास लोखंडे ,सागर कांबळे ,समाधान कांबळे ,पांडुरंग बागाव ,सुधीर कांबळे,राहुल साठे माऊली बागाव,रफिक मुलाणी उपस्थित होते.

एसटी नियमितपणे चालू ठेवण्यासाठी तरंगफळ येथूनजास्तीत जास्त विद्यार्थी आणि प्रवासी यांनी एसटी मधून प्रवास करण्यासाठी गावातील सर्वानी प्रयत्न करण्याचे आवाहन किरण साठे यांनी केले,त्यावर सत्काराच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी जास्तीत जास्त प्रवासी एसटी मधून प्रवास करण्यासाठी आम्ही जनजागृती करण्याचे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom