निसर्गा प्रति कृतज्ञता कार्यक्रम संपन्न !
कार्यकारी अभियंता श्रीमती सुनीता पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण….
प्रतिनिधी : अकलूज : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यावतीने झाडे लावा झाडे जगवा या योजनेप्रमाणे निसर्गाप्रती कृतज्ञता या कार्यक्रमाच्या निमित्ताने सार्वजनिक बांधकाम पुणे विभागाचे मुख्य अभियंता श्री अतुल चव्हाण यांच्या प्रेरणेने सोलापूर जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता श्री.संजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती सुनिता पाटील यांच्या हस्ते अकलूज,महाळुंग,बोरगाव माळखांबी,तोंडले-बोडंले,तांदुळवाडी,फळवणी शिंगोर्णी रस्ता प्रजिमा ९३ कि.मी ०/०० ते ७/४०० (भाग अकलूज ते म्हाळुंग ) तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी सहाय्यक कार्यकारी अभियंता श्रीमती मोनिका धायतडक,सहाय्यक कार्यकारी अभियंता सागर मस्के, उप अभियंताश्री एल टी डाके,उप अभियंता श्री श्याम कास्ते,करमाळा विभागाचे उप अभियंता श्री उबाळे हे उपस्थित होते.
