बहुजन ब्रिगेड संघटनेची माढा तालुका कार्यकारणी जाहीर..
माढा संपर्क प्रमुख पदी राणे तर तालुका अध्यक्षपदी पाटोळे यांची निवड
प्रतिनिधी : पंढरपूर : बहुजन ब्रिगेड संघटनेची बैठक पंढरपूर येथील विश्रामगृह येथे पार पडली.संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष किरण साठे,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दत्ता कर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रथमेश अडगळे,पंढरपूर शहराध्यक्ष अमोल घोडके यांनी माढा तालुक्याच्या संपर्क प्रमुख पदी दीपक राणे यांची तर युवक तालुकाध्यक्ष पदी नागेश पाटोळे यांची निवड करण्यात आली. तसेच अंजनगाव शाखा अध्यक्षपदी सुरेश गायकवाड यांची निवड करण्यात आली.निवडीचे पत्र पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे याच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रथमेश अडगळे ,पंढरपूर शहराध्यक्ष अमोल घोडके,पंढरपुर तालुकाध्यक्ष महादेव मस्के,विशाल नाईक सर,रोहित साठे,राजु पाटोळे नितीन पाटोळे प्रकाश पाटोळे,ऋतूराज भुईरकर, केशव पाटोळे,महेश साठे,सुषम पाटोळे,अशोक मोरे उपस्थित होते.
