अब्दुल सत्तार,केंद्र सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध
अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी.
प्रतिनिधी : : शेतकऱ्यांच्या बाबतीत अपमानकारक वक्तव्य करणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या आणि घरगुती गॅस व व्यवसायिक गॅसच्या वाढत्या दराच्या निषेधार्थ अकलूज येथील उपविभागीय अधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.निवेदन नायब तहसिलदार ए एस देसाई यांनी स्वीकारली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे,अकलूज शहराध्यक्ष सुरेश गंभीरे,युवक तालुका उपाध्यक्ष जाकीर शेख,युवक शहराध्यक्ष अविनाश सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अकलूज उप शहराध्यक्ष इरफान बागवान,बाबुराव शेडगे,पिंटू एकतपुरे,सचिन चंदनशिवे,गणेश महापुरे,सरफराज बागवान उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे सद्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना उद्देशून अपमानकारक वक्तव्य केले आहे.तसेच नुकत्याच घरगुती गॅस,आणि व्यावसायिक गॅस दराच्या किमती केंद्र सरकारने वाढवल्या आहेत,देशात महागाईने हैदोस घातलेला असताना केंद्र सरकारने गॅस च्या दरात वाढ करून सर्वसामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. त्यामुळे महागाई वाढवणाऱ्या आणि महागाई नियंत्रनात न ठेवू शकणाऱ्या केंद्र सरकारचा आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत अपमानकारक वक्तव्य करणाऱ्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा निषेध करण्यात आला. तसेच अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.
